तुर्कस्तानमध्ये एका बाजूला वणवे पेटले तर दुसऱ्या बाजूला महापुराने हाहाकार


विशेष प्रतिनिधी

अंकारा : तुर्कस्तानमध्ये एकीकडे जंगलांमध्ये वणव्यांमुळे होरपळ होत असताना उत्तर भागात पावसानेही थैमान घातले आहे. मुसळधार पावसामुळे येथे अनेक ठिकाणी पूर आले असून यामध्ये आतापर्यंत २७ जणांचा मृत्यू झाला आहे. Fire and flood same time in Turki

कोळसा, तेल आणि नैसर्गिक वायूच्या ज्वलनामुळे पर्यावरण बदलाचा वेग वाढला असून त्यामुळेच अवकाळी आणि अतिरिक्त पाऊस, उष्णतेच्या लाटा, दुष्काळ, वणवे, पूर, वादळे यांचे प्रमाण वाढले आहे, असे मत पर्यावरण तज्ज्ञां नी व्यक्त केले आहे. अशा प्रकारच्या घटना जगात इतर ठिकाणीही अधिक प्रमाणात घडू शकतात, असा इशाराही त्यांनी दिला आहे.

पावसामुळे नद्या धोक्याची पातळी ओलांडून वेगाने वहात असल्याने दोन दिवसांत पाच पूल कोसळले आहेत. १९ हेलिकॉप्टर, २४ बोटी आणि साडे चार हजार जवान बचाव कार्य करत असले तरी अनेक रस्ते अद्यापही पाण्याखाली असून काही गावांमध्ये वीजही नसल्याने अनेक अडथळे येत आहेत.

उत्तरेत पुराने तडाखा दिला असताना दक्षिणेकडे मुल्गा प्रांतात वणव्यांवर नियंत्रण मिळविण्यासाठी अग्निशमन दलाची प्रयत्नांची पराकाष्ठा सुरु आहे. २८ जुलैपासून या भागात दोनशेहून अधिक ठिकाणी वणवे पेटलेले आहेत. आगीमुळे आठ जणांचा होरपळून मृत्यू झाला असून हजारो जणांना विस्थापित व्हावे लागले आहे.

Fire and flood same time in Turki

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात