वृत्तसंस्था
वॉशिंग्टन : Donald Trump अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जवळपास 50 वर्षे जुना फॉरेन करप्ट प्रॅक्टिसेस अॅक्ट (FCPA) स्थगित केला आहे. यामुळे परदेशात व्यवसायासाठी लाच देणे आता गुन्हा राहणार नाही.Donald Trump
या कायद्याअंतर्गत अमेरिकेत भारतीय उद्योगपती गौतम अदानी यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ज्यामध्ये त्याच्यावर भारतीय अधिकाऱ्यांना लाच देण्याची योजना आखल्याचा आरोप आहे. पंतप्रधान मोदींच्या अमेरिका दौऱ्याच्या २ दिवस आधी ट्रम्प यांनी हा निर्णय घेतला आहे.
रॉयटर्सच्या वृत्तानुसार, ट्रम्प यांनी अॅटर्नी जनरल पाम बोंडी यांना या कायद्याअंतर्गत घेतलेल्या निर्णयांचा आढावा घेण्यासाठी मार्गदर्शक तत्त्वे तयार करण्याचे निर्देश दिले आहेत. ट्रम्प यांनी आदेश दिला आहे की, इतर देशांमध्ये व्यवसाय जिंकण्यासाठी किंवा टिकवून ठेवण्यासाठी परदेशी अधिकाऱ्यांना लाच दिल्याचा आरोप असलेल्या अमेरिकन लोकांवर न्याय विभागाने खटले चालवणे थांबवावे.
अदानींवर अब्जावधी रुपयांच्या फसवणुकीचा आरोप
गेल्या वर्षी अमेरिकेत उद्योगपती गौतम अदानी यांच्यासह ८ जणांवर अब्जावधी रुपयांच्या फसवणुकीचा आरोप होता. आरोपपत्रानुसार, अदानी यांच्या कंपनीने भारतातील अक्षय ऊर्जा प्रकल्प अनुचित मार्गाने मिळवले. यासाठी सरकारी अधिकाऱ्यांना २५० दशलक्ष डॉलर्स म्हणजेच सुमारे २,०२९ कोटी रुपये लाच देण्याची योजना आखण्यात आली.
याशिवाय, आरोपींनी अमेरिकन गुंतवणूकदार आणि बँकांना खोटे बोलून पैसे गोळा केले. हे संपूर्ण प्रकरण अदानी ग्रुपची कंपनी अदानी ग्रीन एनर्जी लिमिटेड आणि आणखी एका फर्मशी संबंधित होते. हा खटला २४ ऑक्टोबर २०२४ रोजी न्यू यॉर्कच्या फेडरल कोर्टात दाखल करण्यात आला.
काय आहे एफसीपीए कायदा?
१९७७ मध्ये अमेरिकेने फेडरल करप्ट प्रॅक्टिसेस अॅक्ट (FCPA) लागू केला. याअंतर्गत, अमेरिकेत नोंदणीकृत कंपन्यांना व्यवसाय आणि इतर कारणांसाठी परदेशी अधिकाऱ्यांना लाच देण्यास बंदी घालण्यात आली.
सोमवारी व्हाईट हाऊसच्या ओव्हल ऑफिसमध्ये हा कायदा थांबवण्याच्या आदेशावर स्वाक्षरी करताना ट्रम्प म्हणाले, “या निर्णयामुळे अमेरिकेत नवीन व्यवसाय संधी येतील.”
ट्रम्प यांनी त्यांच्या पहिल्या कार्यकाळात हा कायदा रद्द करण्याची इच्छाही व्यक्त केली होती. त्याला एक भयानक कायदा म्हणत ते म्हणाले की, या कायद्यामुळे जग आपल्यावर हसत आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App