एकनाथ शिंदेंना चुचकारून पवारांचा भाजपवर बाण, पण ठाकरे सेना घायाळ!!

Eknath Shinde

विशेष प्रतिनिधी

मुंबई : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना चुचकारून शरद पवारांनी भाजप वर बाण सोडला, पण यातून भाजप घायाळ व्हायच्या ऐवजी ठाकरे सेनाच घायाळ झाली. पवारांचा मिठी छुरीचा “राजकीय हल्ला” शिंदेंनी चतुराईने परतावला.Eknath Shinde, Pawar’s arrow on BJP, but Thackeray’s army is wounded!!

त्याचे झाले असे :

बरेच दिवस बातम्यांच्या बाहेर राहिल्यानंतर शरद पवारांनी एकनाथ शिंदे यांच्या महादजी शिंदे पुरस्काराने सन्मानाच्या सोहळ्याच्या निमित्ताने एकनाथ शिंदे यांना चुचकारले. भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्यातला तथाकथित तणाव आणि त्याच्या बातम्या या पार्श्वभूमीवर शरद पवारांनी एकनाथ शिंदेंना गुंडाळायचा प्रयत्न केला. पवार – शिंदे जवळीक पाहून भाजप नेत्यांचे कान उभे राहणे अपेक्षित होते किंबहुना पवारांना भाजपच्याच नेत्यांना डिवचायचे होते. परंतु, प्रत्यक्षात झाले उलटेच!! पवार – शिंदे जवळीक पाहून उद्धव ठाकरे सेना अस्वस्थ झाली. संजय राऊत एकनाथ शिंदेंना ठोकता ठोकता शरद पवारांवर घसरले. गद्दारांचा सन्मान हा मराठी अस्मितेला धक्का आहे आणि तो दलालांच्या साहित्य संमेलनाने केला आहे, असे टीकास्त्र संजय राऊत यांनी सोडले.



ज्या दिल्लीच्या साहित्य संमेलनात शरद पवारांनी एकनाथ शिंदेंचा सत्कार केला, ते साहित्य संमेलन सरहद संस्थेने दिल्लीत भरवले असून शरद पवार त्या संमेलनाचे स्वागत अध्यक्ष आहेत आणि त्या संमेलनाला संजय राऊत यांनी दलालांचे साहित्य संमेलन ठरवून टाकले. त्यामुळेच एकनाथ चुचकारून शरद पवारांनी भाजपवर बाण सोडला, पण प्रत्यक्षात ठाकरे सेना घायाळ झाल्याचे चित्र दिसले.

Eknath Shinde, Pawar’s arrow on BJP, but Thackeray’s army is wounded!!

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात