विशेष प्रतिनिधी
बीजिंग – अमेरिकेचे अध्यक्ष ज्यो बायडेन यांची आगामी लोकशाही परिषद चीन व अमेरिकेमध्ये वादाचे कारण ठरत असून चीनच्या हुकूमशाही व्यवस्थेला हे आव्हान असल्याचे चीनला वाटत आहे.China objects US democracy summit
चीनमधील सध्याचे लोकशाहीचे स्वरूप कायम ठेवण्याचा सत्ताधारी कम्युनिस्ट पक्षाचा मानस असून ‘चायना ः डेमोक्रसी दॅट वर्क्स’ या शीर्षकाचा अहवाल शनिवारी प्रसिद्ध करण्याचे नियोजन सरकारने आखले आहे. लोकशाही परिषदेचे उद्घारटन बायडेन यांच्या हस्ते गुरुवारी होणार आहे.
त्यापूर्वी हा अहवाल प्रकाशित करण्याचा चीनचा प्रयत्न आहे. बायडेन यांच्या लोकशाही परिषदेने देशांमध्ये फूट पडण्याचची शक्यता चीनी अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.या परिषदेत एकमेकांची उणीदुणी काढली जातील, असा दावाही त्यांनी केला आहे. चीनचे हे आरोप अमेरिकेने फेटाळून लावले आहेत.
जगात लोकशाही कास पकडण्यासाठी एकत्र काम करण्यावर परिषदेत चर्चा होणार आहे, असा खुलासा व्हाइट हाउसच्या जनसंपर्क सचिव जेन पास्की यांनी केला आहे. व्हर्च्युहअल पद्धतीने होणाऱ्यान दोन दिवसांच्या परिषदेत ११० देश सहभागी होणार आहेत.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App