IND V/s NZ : एजाज पटेलने पटकावल्या सर्व १० विकेट, कुंबळेची केली बरोबरी, भारताच्या सिराजनेही किवी सलामीविरांना धाडले माघारी


वानखेडे स्टेडियमवर खेळल्या जात असलेल्या भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्याचा आज दुसरा दिवस आहे. डावखुरा फिरकी गोलंदाज एजाज पटेल हा कसोटी क्रिकेटमध्ये एका डावात सर्व दहा बळी घेणारा जगातील तिसरा गोलंदाज ठरला आहे. दुसऱ्या क्रिकेट कसोटीच्या दुसऱ्या दिवशी शुक्रवारी पहिल्या डावात भारतीय संघ 325 धावांवर बाद झाला. कालच्या 4 बाद 221 धावसंख्येच्या पुढे खेळताना भारताने सकाळच्या सत्रात 64 धावा जोडल्या आणि दोन विकेट गमावल्या. उपाहारानंतर आणखी 40 धावा जोडताना भारताने चार विकेट गमावल्या. ajaz patel creates history by taking 10 wickets in an innings of test match third spinner to do so


वृत्तसंस्था

मुंबई : वानखेडे स्टेडियमवर खेळल्या जात असलेल्या भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्याचा आज दुसरा दिवस आहे. डावखुरा फिरकी गोलंदाज एजाज पटेल हा कसोटी क्रिकेटमध्ये एका डावात सर्व दहा बळी घेणारा जगातील तिसरा गोलंदाज ठरला आहे. दुसऱ्या क्रिकेट कसोटीच्या दुसऱ्या दिवशी शुक्रवारी पहिल्या डावात भारतीय संघ 325 धावांवर बाद झाला. कालच्या 4 बाद 221 धावसंख्येच्या पुढे खेळताना भारताने सकाळच्या सत्रात 64 धावा जोडल्या आणि दोन विकेट गमावल्या. उपाहारानंतर आणखी 40 धावा जोडताना भारताने चार विकेट गमावल्या.

दुसरीकडे, फलंदाजीसाठी आलेल्या किवी सलामीविरांनाही भारताचे सिराजने पॅव्हेलियनमध्ये परत पाठवले आहे. पहिल्या डावात न्यूझीलंडची सुरुवात खराब झाली आणि तिसऱ्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर मोहम्मद सिराजने विल यंगला (४) कॅप्टन कोहलीने झेलबाद केले. त्याच षटकातील शेवटच्या चेंडूवर सिराजने टॉम लॅथमची (10) विकेट घेतली.

एजाज खानची फिरकी मयांक अग्रवालशिवाय भारताच्या एकाही फलंदाजाला समजू शकली नाही. एजाजने सर्व 10 विकेट घेतल्या. भारतात अशी कामगिरी करणारा एजाज पहिला विदेशी गोलंदाज ठरला आहे. एजाजचा जन्म 21 ऑक्टोबर 1988 रोजी मुंबईत झाला. तो आठ वर्षांचा असताना त्याचे कुटुंब न्यूझीलंडला गेले. त्याची अ‍ॅक्शन आणि देहबोली ही भारतीय स्टार ऑलराऊंडर रवींद्र जडेजासारखी आहे.पहिल्या कसोटी सामन्यात एजाज १०व्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आला होता. भारताला कानपूर कसोटी जिंकता आली असती, पण कोणताही निकाल न लागला ती रोमहर्षक पद्धतीने संपली. या सामन्यात किवी संघासमोर 284 धावांचे लक्ष्य होते, मात्र शेवटच्या दिवशी दमदार फलंदाजी करत न्यूझीलंडने सामना अनिर्णित ठेवला. रचिन रवींद्र आणि एजाज पटेल यांनी सामना अनिर्णित राखण्यात मोठा वाटा उचलला. रचिनने 91 चेंडू खेळले, तर एजाजनेही विकेट वाचवताना 23 चेंडूंचा सामना केला. या जोडीने शेवटच्या विकेटसाठी एकूण 52 चेंडूंचा सामना केला.

एजाजने रचला विक्रम

एजाजने सलग दोन चेंडूंवर साहा (27) आणि अश्विन (0) यांना एलबीडब्ल्यू केले. पटेलची हॅटट्रिक हुकली, पण त्याने साहाला बाद करत डावात आपल्या 5 बळी पूर्ण केले. भारतीय भूमीवर पहिल्या 6 विकेट घेणारा एजाज पटेल हा दुसरा विदेशी गोलंदाज आहे. याआधी इंग्लंडच्या जॉन लीव्हरने 1976 मध्ये दिल्ली कसोटीत हा पराक्रम केला होता.

एजाज भारतातील कसोटीच्या पहिल्या डावात किवी फिरकीपटूकडून सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाजही ठरला. त्याच्या आधी जीतन पटेलने 2012 मध्ये हैदराबाद कसोटीच्या पहिल्या डावात 4 विकेट घेतल्या होत्या. त्याचवेळी डॅनियल व्हिटोरीने 1999 आणि 2010 मध्ये भारताविरुद्ध अहमदाबाद कसोटीच्या पहिल्या डावात 4-4 विकेट घेतल्या होत्या.

ajaz patel creates history by taking 10 wickets in an innings of test match third spinner to do so

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात