काय म्हणताय? प्रियांका आणि निक होणार वेगळे?

 विशेष प्रतिनिधी

दिल्ली : देसी गर्ल प्रियांका चोप्रा नेहमीच चर्चेत असते. तीन वर्षांपूर्वी प्रियांकाने अमेरिकन सिंगर निक जोनस याच्यासोबत लग्न केले आहे. नुकताच तिने आपल्या ट्विटर आणि इन्स्टाग्राम अकाऊंटवरून जोनस हे आडनाव वगळून फक्त प्रियांका चोप्रा असे ठेवले होते. थोड्या वेळाने तिने चोप्रा हे आडनाव देखील आपल्या सर्व सोशल मीडिया हॅण्डलवरून रिमूव्ह केले आणि फक्त प्रियांका असेच नाव आपल्या सोशल मीडिया अँड हॅण्डलसाठी वापरण्याचे ठरवले.

What are you saying? Priyanka and Nick are getting divorced?

हे पाहता सोशल मिडीयावर एकच लाट उठली की, प्रियांका आणि निक वेगळे होणार आहेत. पण मित्रांनो, असं काही नाहीये. प्रियांका आणि निक आजही तितकेच एकमेकांच्या प्रेमात आहे जितके ते तीन वर्षांपूर्वी होते. असे प्रियांकाच्या जवळच्या मैत्रिणींनी इंडिया टुडेसोबत बोलताना सांगितले आहे.


प्रियांका चोप्राच्या ‘अनफिनिश्ड’ पुस्तकाला मिळाले ग्रॅमी अवॉर्ड्स 2020 नॉमिनेशन


तिने पुढे हे देखील सांगितले की, प्रियांकाने आपल्या भविष्यातील प्रोजेक्टसाठी फक्त प्रियांका हे नाव वापरण्याचे ठरवले आहे आणि त्याचसाठी चोप्रा आणि जोनस ही दोन्ही आडनावे आपल्या सोशल मीडिया हॅण्डलवरून काढली आहेत.

प्रियांका आगामी मॅट्रिक्स 4 या सिनेमामध्ये झळकणार आहे. त्यात सिनेमातील तिचा फर्स्ट लूक नुकताच सोशल मिडिया हॅन्डलवर तिने शेअर केला आहे. या वेगळ्या धाटणीच्या भूमिकेमध्ये प्रियांका एकदम डॅशिंग सुपरकूल दिसत आहे.

What are you saying? Priyanka and Nick are getting divorced?

 

महत्त्वाच्या बातम्या