विशेष प्रतिनिधी
मुंबई : प्रवीण दराडे यांची प्रमुख भूमिका असणाऱ्या सरसेनापती हंबीरराव या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. प्रथमच मराठीमध्ये इतका भव्यदिव्य सेट आणि व्हीएफएक्स इफेक्ट्स अस काहीतरी वेगळे पाहायला मिळणार आहे.
Trailer of Praveen Tarade’s Sarsenapati Hambirrao released, Bahubali fame praised trailer
या चित्रपटाची कथा पटकथा संवाद दिग्दर्शन प्रवीण दराडे यांनी केलेली आहे. गश्मीर महाजनी याने या चित्रपटामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारली आहे.
https://www.facebook.com/100000338537393/videos/620119062635440/
भारतीय २१ वर्षीय कश्यपने ‘स्पायडर मॅन : नो वे होम’ सिनेमाच्या टीव्ही कमर्शियल साठी कंपोज केले गाणे
या चित्रपटाचा ट्रेलर अत्यंत प्रॉमिसिंग वाटत आहे. बऱ्याच हिंदी कलाकारांनी देखील या चित्रपटाच्या ट्रेलरचे कौतुक केले आहे. बाहुबली फेम अभिनेता प्रभासने देखील फेसबुकवर या चित्रपटाचा ट्रेलर शेअर करत प्रवीण दराडे यांचे आणि चित्रपटाच्या ट्रेलरचे कौतुक केले आहे. त्याचप्रमाणे रवीना टंडनने देखील पोस्ट शेअर करत या चित्रपटाच्या ट्रेलरचे कौतुक केले आहे.
तर कोण होते हंबीरराव मोहिते?
हंबीरराव मोहिते हे छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांचे सेनापती होते. आपल्या चाणाक्ष बुद्धीमत्तेच्या जोरावर आणि साहसी, धाडसी वृत्तीमुळे त्यांनी स्वराज्याला श्रीमंती मिळवून देण्यास अत्यंत मोलाची मदत केली होती.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App