चौधरी चरण सिंग यांच्यासाठी भारतरत्नची मागणी; योगी – मोदींना आज झोप येणार नाही; जयंत चौधरींचा हल्लाबोल


वृत्तसंस्था

अ्लिगड : उत्तर प्रदेशात समाजवादी पक्ष आणि राष्ट्रीय लोकदल यांची आघाडी निवडणूक लढवत आहे.% आज अलिगड मध्ये या आघाडीची संयुक्त रॅली झाली. यामध्ये राष्ट्रीय लोकदलाचे नेते जयंत चौधरी यांनी जनतेला संबोधित केले. Jayant chaudhary targets Modi and Yogi in alighar

जयंत चौधरी म्हणाले, की समाजवादी पक्षाचे प्रमुख आणि माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी केंद्र सरकारकडे माजी पंतप्रधान चौधरी चरण सिंग यांना भारतरत्न किताब देण्याची मागणी केली आहे. दिल्लीतील “त्या” लोकांनी चौधरी साहेबांचा कधी उचित सन्मान केला नाही.


लखनऊ कोर्टाने सपना चौधरी विरोधात काढलं अटक वॉरंट ; २२ नोव्हेंबर रोजी सुनावणी होणार


आज जेव्हा अखिलेश यादव यांनी चौधरी साहेबांना भारतरत्न देण्याची मागणी केली आहे, त्या वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तर प्रदेश मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना आज रात्री झोप येणार नाही. शेतकऱ्यांना कायम या दोन्ही नेत्यांनी फसवले आहे. समाजवादी पार्टी आणि राष्ट्रीय लोकदल यांच्या संयुक्त रॅलीमध्ये शेतकऱ्यांचा जो जनसागर उसळला आहे तो पाहून उत्तर प्रदेशातल्या योगी सरकारला हादरा बसला आहे, असा दावाही जयंत चौधरी यांनी केला आहे.

आजच्या संयुक्त रॅलीला अखिलेश यादव हे देखील संबोधित करणार होते. परंतु अखिलेश यादव यांच्या पत्नी डिंपल आणि त्यांच्या मुलाला कोरोना झाल्याने ते स्वतः काही दिवस क्वारंटाईन झालेत. त्यामुळे अलिगडच्या रॅलीमध्ये ते उपस्थित नव्हते. जयंत चौधरी आणि समाजवादी पक्षाच्या स्थानिक नेत्यांनी रॅलीमध्ये संबोधित केले.

Jayant chaudhary targets Modi and Yogi in alighar

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*