मोठी बातमी : वंचित बहुजन आघाडीचा ओबीसी आरक्षणासाठी विधान भवनावर धडक मोर्चा, प्रकाश आंबेडकरांना पोलिसांनी घेतलं ताब्यात

Big News Vanchit Bahujan Aghadi Dhadak Morcha on Vidhan Bhavan for OBC reservation, Police arrest Prakash Ambedkar

Vanchit Bahujan Aghadi Dhadak Morcha : राज्यात सध्या विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरू आहे. आज अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी वंचित बहुजन आघाडीने ओबीसी आरक्षणासाठी विधान भवनावर धडक मोर्चा काढला. दरम्यान, पोलिसांनी वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष, ज्येष्ठ नेते अॅड. प्रकाश आंबेडकर यांना ताब्यात घेतलं आहे. याबरोबरच वंचित आघाडीच्या अनेक कार्यकर्त्यांचीही धरपकड करण्यात आली आहे. Big News Vanchit Bahujan Aghadi Dhadak Morcha on Vidhan Bhavan for OBC reservation, Police arrest Prakash Ambedkar


प्रतिनिधी

मुंबई : राज्यात सध्या विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरू आहे. आज अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी वंचित बहुजन आघाडीने ओबीसी आरक्षणासाठी विधान भवनावर धडक मोर्चा काढला. दरम्यान, पोलिसांनी वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष, ज्येष्ठ नेते अॅड. प्रकाश आंबेडकर यांना ताब्यात घेतलं आहे. याबरोबरच वंचित आघाडीच्या अनेक कार्यकर्त्यांचीही धरपकड करण्यात आली आहे. सरकारकडून दडपशाही सुरू असल्याचा आरोप प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे.

प्रकाश आंबेडकरांनी ओबीसींच्या जातीनिहाय जनगणनेची मागणी सरकारकडे केली आहे. यासाठी आज विधानभवनावर मोर्चा काढण्यात आला. अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर या परिसरात जमावबंदी आहे, मात्र ही जमावबंदी झुगारून प्रकाश आंबेडकर सीएसएमटी ते विधानभवन असा मोर्चा काढला.

‘जमावबंदीचा आदेश झुगारून मोर्चा काढणारच’

दरम्यान, मोर्चा काढण्यापूर्वीच प्रकाश आंबेडकर यांनी सरकारला स्पष्ट इशारा दिला होता. ते म्हणाले होते की, “वंचित बहुजन आघाडीच्या वतीने ओबीसींच्या जातनिहाय जनगणनेच्या मागणीसाठी विधानसभा अधिवेशनावर 23 डिसेंबर रोजी मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. मात्र, राज्य सरकार मुंबईमध्ये विनाकारण जमावबंदी लागू करून आमचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत आहे. मुंबईत जमावबंदी लावण्याचे कोणतेही सबळ कारण दिसत नाही. सरकार कायद्याचा दुरुपयोग करून जनतेचा आवाज दाबणार असेल तर सरकारचा जमावबंदी आदेश झुगारून आम्ही मोर्चा काढू.”

राज्यात ओबीसींचे राजकीय आरक्षण बाद

महाराष्ट्रात ओबीसींना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये 27 टक्के राजकीय आरक्षण देण्याचा ठाकरे-पवार सरकारने काढलेला अध्यादेश सुप्रीम कोर्टाने रद्द केला. यामुळे महाराष्ट्रात सध्या सुरू असलेल्या 105 नगरपंचायत निवडणुकांमध्ये ओबीसी प्रवर्गातील निवडणूक प्रक्रियाही स्थगित झाली. यानंतर ओबीसींच्या या जागांवर खुल्या प्रवर्गातील निवडणुका घेण्याचा निर्णय आयोगाने घेतला. ओबीसींचे राजकीय आरक्षण रद्द झाल्याने ठाकरे सरकावर चहुबाजूंनी टीकेची झोड उठली आहे.

Big News Vanchit Bahujan Aghadi Dhadak Morcha on Vidhan Bhavan for OBC reservation, Police arrest Prakash Ambedkar

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात