कोटा फॅक्टरी २ ते टाइम्स टूल्स इंडिया डिटेक्टिव्ह, या आठवड्यात ओटीटी वर रिलीज होणाऱ्या धमाकेदार वेबसीरिज


विशेष प्रतिनिधी 

 

मुंबई: कोरोना काळात लॉकडाऊन झाल्यानंतर ओटीटी प्लॅटफॉर्मवर वेबसीरिजची लोकप्रियता वाढली. चित्रपटगृहे बंद झाल्यामुळे ओटीटीवर  अनेक चित्रपट व वेब सीरिज रिलीज करण्यात आले. नेटफ्लिक्सवर मनी हाईस्ट या सीरिजने प्रचंड लोकप्रियता मिळवली. नेटफ्लिक्स, अॅमेझॉन प्राइम, हॉटस्टार यांसारखे ओटीटी प्लॅटफॉर्म लोकांचे मनोरंजनाचे मुख्य साधन बनले.

This week OTT Release, Kota factory 2, Birds of Paradise and many more, get ready for new dose of entertainment

चित्रपटगृहे उघडल्यानंतरही आता ओटीटीची क्रेझ  कमी झालेली नाही. या आठवड्यात प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत असलेल्या, तसेच वेगळ्या धाटणीचे चित्रपट आणि सीरिजही रिलीज होत आहेत. प्रेक्षकांसाठी ही मनोरंजनाची मेजवानीच आहे असे म्हणावे लागेल.


Netflix : आता मित्रांना पासवर्ड शेअर करणे होईल कठीण, व्हेरिकेशन होणार अनिवार्य


कोटा फॅक्टरी २ :

IMDb वर ९.२ रेटिंग असलेल्या कोटा फॅक्टरीचा आता दुसरा सिझन येत आहे. नेटफ्लिक्सने २४ सप्टेंबर रोजी हा सीझन रिलीज होईल अशी घोषणा केलेली आहे. आयआयटीमधील विद्यार्थ्यांसाठी ही रिलेटेबल वेबसीरिज आहे. १६ वर्षीय वैभवच्या आयआयटीमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी केलेल्या संघर्षाची कथा यात दाखविण्यात आलेली आहे. २४ सप्टेंबरला ही सीरिज नेटफ्लिक्सवर रिलीज होईल व त्यामध्ये आपल्याला जितेंद्र कुमार, अहसास चन्ना आणि मयूर मोरे हे मुख्य भुमिका निभावताना दिसतील.

मिडनाइट मास :

चोवीस सप्टेंबर रोजी नेटफ्लिक्सवर ही वेबसीरिज रिलीज करण्यात येईल. ही हॉरर कथा एका आइसलंड समुदायावर आधारित आहे. यामध्ये रिले नावाचा एक तरुण शहरात परततो आणि तो आल्यानंतर काही चमत्कारिक गोष्टी घडतात. या मालिकेत जेच गिलफोर्ड (Jach Gilford), हॅमिश लिंकलेटर आणि केट सीगेल यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

बर्ड्स ऑफ पॅराडाईज :

हा अमेरिकन चित्रपट २०१९ च्या ‘ब्राइट बर्निंग स्टार्स’ या कादंबरीवर आधारित असून २४ सप्टेंबर रोजी अॅमेझॉन प्राईमवर रिलीज होईल. या सीरिजमध्ये आपल्याला क्रिस्टीन प्रोसेथ (Christin Froseth), डायना सिल्व्हर्स आणि जॅकलिन बीसेट मुख्य भुमिका निभावताना दिसतील.

क्राइम स्टोरीज : इंडिया डिटेक्टिव्ह

ही सीरिज २२ सप्टेंबरला नेटफ्लिक्सवर रिलीज झालेली आहे. ही सीरिज ४ कथांनी बनलेली आहे. ज्यात पोलिसांबरोबरच बंगळुरुचे चार गुप्तचर एका रहस्यमय प्रकरणाचा तपास करताना दाखवले गेले आहेत. थ्रिलिर विषयाची आवड असलेल्या प्रेक्षकांसाठी ही सीरिज नक्कीच पाहण्याजोगी आहे.

This week OTT Release, Kota factory 2, Birds of Paradise and many more, get ready for new dose of entertainment

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात