सिद्धूची दांडी उडवण्यासाठी कोणत्याही बलिदानास तयार कॅप्टन अमरिंदर


पंजाबच्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिलेल्या कॅप्टन अमरिंदरसिंग यांनी कॉंग्रेस नेता नवज्योतसिंग सिद्धू यांच्या विरोधातल्या संघर्षाची धार तीव्र केली आहे. सिद्धू सारख्या धोकादायक माणसापासून देशाला वाचवण्यासाठी कोणताही त्याग करण्यास मी सज्ज असल्याचे त्यांनी म्हटले आहे. यामुळे अमरिंदरसिंग भाजपाशी हातमिळवणी करण्याच्या चर्चेला तोंड फुटले आहे. Capt Amarinder Singh declared that he would fight Navjot Sidhu’s elevation to Punjab chief ministership tooth and nail, and was ready to make any sacrifice to save the country from such a dangerous man.


वृत्तसंस्था

चंदीगड : पंजाब कॉंग्रेसचे सर्वात वजनदार नेते कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी पंजाब कॉंग्रेसची सूत्रे सांभाळणाऱ्या नवज्योतसिंग सिद्धू यांच्यावर हल्लाबोल केला आहे. सिद्धूला पंजाबच्या मुख्यमंत्रिपदापासून दूर ठेवण्यासाठी निकराची लढाई लढण्यासाठी मी सज्ज आहे. या धोकादायक माणसापासून देशाला वाचवण्यासाठी कोणतेही बलिदान देण्यास तयार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

कोणत्याही स्थितीत सिद्धूला पंजाबच्या मुख्यमंत्रीपदाची खुर्ची मिळू देणार नसल्याच्या इराद्याचा पुनरुच्चार अमरिंदर यांनी केला. ते म्हणाले की, 2022 च्या विधानसभा निवडणुकीत सिद्धू यांचा पराभव सुनिश्चित करण्यासाठी मी त्यांच्या विरोधात मजबूत उमेदवार उभा करीन. “सिद्धू राज्यासाठी धोकादायक आहे,” असे या माजी मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

सन 2022 मध्ये होणाऱ्या पंजाब विधानसभा निवडणुकीत कॉंग्रेसला विजय मिळवून दिल्यानंतर बाहेर जाण्यासाटी मी तयार होतो. परंतु, आत्ताच्या परिस्थितीनंतर मी रणांगण सोडून देणार नाही, असे माजी मुख्यमंत्री अमरिंदरसिंग म्हणाले. ते म्हणाले की, तीन आठवड्यांपूर्वीच कॉंग्रेस अध्यक्ष सोनिया गांधीं यांच्याकडे मी राजीनामा देऊ केला होता. परंतु त्यांनी मला पदावर कार्यरत राहण्यास सांगितले होते. “जर त्यांनी मला साधा एक फोन जरी करुन पद सोडण्यास सांगितले असते तरी मी ते ऐकले असते,” असे स्पष्ट करुन अमरिंदर म्हणाले की, एक सैनिक म्हणून, मला माझे काम कसे करायचे हे माहित आहे. एकदा मला परत बोलावल्यानंतर मी निघून गेलो असतो.



पंजाबमध्ये कॉंग्रेसला दुसऱ्यांदा विजय मिळवून दिल्यानंतर मी राजकारणातून निवृत्त होण्यास मोकळा आहे. त्यानंतर आपण कोणासही पंजाबचे मुख्यमंत्री करा, असे मी सोनिया गांधी यांना सांगितले होते, असे कँप्टन अमरिंदर म्हणाले. “पण तसे झाले नाही, म्हणून मी लढा देईन. मला विश्वासात न घेता गुप्त पद्धतीने बैठका घेत माझा अवमान करण्यात आला,” याचा पुनरुच्चार त्यांनी केला. “मी आमदारांना गोवा किंवा अन्य ठिकाणी विमानाने पळवून नेले नसते. असली नौटंकी मी करत नाही आणि हे राहुल-प्रियंका या भावा-बहिणींनाही माहित,” असे ते पुढे म्हणाले. “प्रियंका आणि राहुल माझ्या मुलांसारखी आहेत. पण घडल्या प्रकाराने मी दुखावलो गेलो आहे,” अशी व्यथा कँप्टन अमरिंदर यांनी व्यक्त केली.

राजकीय पर्याय खुले

ते कॉंग्रेस पक्षाने पाठींबा दिलेल्या नवज्योतसिंग सिद्धू यांच्या पराभवाची शपथ घेतलेल्या कँप्टन अमरिंदरसिंग यांनी त्यांच्यापुढचे सगळे राजकीय पर्याय खुले असल्याचे स्पष्ट केले आहे. ते म्हणाले की, भविष्यातील वाटचालीचा निर्णय घेण्यापूर्वी मी सहकाऱ्यांशी बोलत होतो. तुम्ही 40 वर्षांचे वृद्ध असू शकता आणि 80 वर्षांचे तरुणही बनू शकता. त्यामुळे वय हा राजकीय वाटचालीतला अडथळा ठरु शकत नाही, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. अमरिंदरसिंग हे सातवेळा विधानसभेवर निवडून गेले आहेत तर दोनदा ते खासदार म्हणून निवडून गेले आहेत.

मादक पदार्थांच्या प्रकरणात कँप्टन अमरिंदरसिंग यांनी अकाली दलाच्या प्रकाशसिंग बादल व आणि मजीठिया यांच्यावर योग्य कारवाई केल्या नसल्याचा आरोप केला जातो. याला प्रत्युत्तर देताना ते म्हणाले की, कायदेशीर मार्ग काढावा लागतो. पण आता जे लोक माझ्याविरोधात तक्रार करत होते ते सत्तेत आहेत, त्यांनी अकाली नेत्यांना तुरुंगात टाकून दाखवावे. खाण माफियांमध्ये सामील असलेल्या मंत्र्यांवर कारवाई न केल्याच्या आरोपावरून सिद्धू अँड कंपनीची खिल्ली उडवत ते म्हणाले, “ते मंत्री आता या नेत्यांकडे आहेत!”

आता दिल्लीतून पंजाबची सूत्रे हलवली जातील, असे सांगत अमरिंदर यांनी निराशा व्यक्त केली. वेणुगोपाल किंवा अजय माकन किंवा रणदीप सुरजेवालासारखे काँग्रेस नेते कोणत्या मंत्रालयासाठी चांगले आहेत हे कसे ठरवू शकतात, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. नवनियुक्त कॉंग्रेस मुख्यमंत्री चरणजीत सिंह चन्नी यांच्या कार्यक्षेत्रात सिद्धू यांच्या स्पष्ट हस्तक्षेपावर टीका करताना माजी मुख्यमंत्री म्हणाले की, पंजाब कॉंग्रेसने फक्त पक्षाच्या कारभारावर निर्णय घ्यावा. “माझ्या कारकिर्दीत पंजाब कॉंग्रेसचे अध्यक्ष खूप चांगले होते. मी त्यांचा सल्ला घेतला पण त्यांनी सरकार कसे चालवायचे हे मला कधीच सांगितले नाही,” असे ते म्हणाले. सिद्धू, जे स्वतःचे मंत्रालय सांभाळू शकत नाहीत, त्यांनी मंत्रिमंडळ सांभाळणे ही पंजाबसाठी दुःखद परिस्थिती असल्याची टीका त्यांनी केली. “जर सिद्धू सुपर सीएम म्हणून वागणार असतील तर कॉंग्रेस पक्ष काम करणार नाही. या ड्रामा मास्टरच्या नेतृत्वाखाली कॉंग्रेसनी दोन अंकी संख्या गाठली तरी खूप मोठी गोष्ट असेल,” असे ते म्हणाले.

नवे मुख्यमंत्री चन्नी हुशार आणि सुशिक्षित असले तरी दुर्दैवाने, त्यांना गृह व्यवहार सांभाळण्याचा कोणताही अनुभव नाही. हे पंजाबसाठी गंभीर आहे कारण पंजाबची पाकिस्तानबरोबर 600 किलोमीटरची सीमा आहे आणि दिवसेंदिवस सीमेवरील प्रश्न अधिक गंभीर रुप धारण करीत आहेत, असेही अमरिंदर म्हणाले. नवीन मुख्यमंत्र्यांनी वीज बिले माफ करण्याची घोषणा केली आहे. यावर टीका करताना ते म्हणाले की, चन्नी यांनी माजी अर्थमंत्र्यांशी चर्चा केली असावी आणि त्यांनी काहीतरी विचार केला असावा. मला आशा आहे की ते पंजाबला दिवाळखोरीच्या वाटेवर नेणार नाहीत.

Capt Amarinder Singh declared that he would fight Navjot Sidhu’s elevation to Punjab chief ministership tooth and nail, and was ready to make any sacrifice to save the country from such a dangerous man.

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात