ह्या पाच कलाकारांनी सिनेमासाठी आपले वजन वाढवले होते


विशेष प्रतिनिधी

मुंबई : अॅक्टिंग हे काही साधं काम नक्कीच नाहीये. एखाद्या भूमिकेमध्ये समरस होऊन काम करण्यासाठी कलाकाराला खूप अभ्यास करावा लागतो. त्या पात्राचे भावविश्व, त्यांच्या विचारसरणी, त्याची विचार करण्याची प्रोसेस या सर्वांचा अभ्यास करावा लागतो. कधी कधी इतकच महत्त्वाचे नसते. तर कधी फिजिकल चेंजेस देखील करावे लागतात. असे बरेचसे बॉलीवूड इंडस्ट्रीमध्ये कलाकार आहेत, ज्यांनी सिनेमाच्या मागणीसाठी आपले वजन वाढवले होते. तर बऱ्याच वेळा कमी देखील केले होते. चला तर पाहूया असे पाच कलाकार ज्यांनी चित्रपटांसाठी खूप मेहनत घेतली होती.

These five actors had gained weight for the movie

1. शाहिद कपूर : शाहिद कपूरचा कबीर सिंग हा चित्रपट मागे प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाने बऱ्याच संमिश्र प्रतिक्रिया मिळवल्या होत्या. या चित्रपटा मध्ये शाहिदने सेल्फ डिस्ट्रक्टिव्ह कॅरेक्टर प्ले केले होते. या चित्रपटामध्ये त्याने एका मेडिकल स्टुडंटचे कॅरेक्टर प्ले केले हाेते. हे मेडिकल स्टुडंटचे कॅरेक्टर प्ले केले होते. यासाठी त्याने 8 kg वजन वाढवले होते. आणि मध्यांतरा नंतरच्या भागासाठी त्याने 14 kg वजन कमी देखील केले होते. हे कॅरेक्टर प्ले करण्यासाठी त्याने 2 दोन महिने दाढी देखील केलेली नव्हती.

2. पद्मावत मधील रणवीर सिंह : पद्मावत या सिनेमामध्ये रणवीर सिंगने अल्लाउद्दीन खिलजीचे पात्र निभावले हाेते. अलाउद्दीन खिल्जी हा इतिहासातील सर्वात क्रूर शासक म्हणून ओळखला जायचा. त्याच्या एक ना अनेक गोष्टी आपण ऐकलेल्या आहेत. जर हे पात्र निभावण्यासाठी, या पात्राचा अभ्यास करण्यासाठी रणवीर सिंगने स्वत:ला एका खोलीमध्ये 14 दिवस बंद केले होते. आणि त्यांने अल्लाउद्दीन खिलजीचा संपूर्ण अभ्यास केला होता. त्यानंतर त्याने हा रोल अतिशय उत्तमरीत्या निभावला होता.


Sooryavanshi Movie : ये दिवाली अक्षय वाली ! अक्षय कुमारचा ‘सूर्यवंशी’ दिवाळीत करणार धमाका ; 5 नोव्हेंबरला होणार रिलीज!


3. क्रिती सेनॉन : क्रिती ही एक उत्कृष्ट अभिनेत्री आहे. मिमी या सिनेमांमध्ये तिने सरोगेट मदरची भूमिका साकारली होती. सत्य घटनांवर आधारित हा सिनेमा होता.या सिनेमामध्ये गरोदर बाईचे कॅरेक्टर प्ले करण्यासाठी तिने जवळपास 15 kg वजन वाढवले होते.

4. रणबीर कपूर : अभिनेता संजय दत्त याची बायोपीक संजू या सिनेमामध्ये रणबीर कपूरने मुख्य भूमिका निभावली होती. ही भूमिका निभावणे त्याच्यासाठी अजिबात सोपे नव्हते. कारण बॉडी बिल्डिंगचे क्रेझ बॉलीवूडमध्ये कोणी आणले असेल तर ते संजय दत्त याने. त्यामुळे रणबीर कपूरला स्वतःच्या शरीरावर प्रचंड मेहनत घ्यावी लागली होती. स्ट्रिक्ट डाएट, जिम हे सर्व त्याला फॉलो करावे लागले होते.

5. विद्या बालन : विद्या बालन ही एक सर्वगुणसंपन्न अभिनेत्री आहे. डर्टी पिक्चर या सिनेमाने तिला प्रसिध्दीच्या झोतात आणले होते. या सिनेमांमध्ये तिने साऊथ इंडियन अॅक्ट्रेस सिल्क स्मिता हिचे कॅरेक्टर प्ले केले होते. हे कॅरेक्टर प्ले करण्यासाठी तिने आपले वजन वाढवले होते. या चित्रपटातील अभिनयासाठी तिला नॅशनल अवॉर्डने देखील सन्मानित करण्यात आले होते

These five actors had gained weight for the movie

 

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    शिंदे – फडणवीसांची समृद्धी महामार्गावर टेस्ट ड्राईव्ह मोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो! मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण