न्यूयॉर्क टाइम्सने धमाका सिनेमातील अमृताने साकारलेल्या भूमिकेचे केले कौतुक


विशेष प्रतिनिधी

मुंबई : अमृता सुभाष ही एक उत्कृष्ट अभिनेत्री आहे. झोया अखतरच्या गली बॉय या सिनेमात तिने साकारलेल्या रोलमुळे तिला प्रसिद्धीच्या शिखरावर नेऊन पोहचवले होते. या सिनेमांमध्ये तिने रणवीरच्या आईचे काम केले होते. एक गरीब, साधीसुधी, नवऱ्याच्या त्रासाला वैतागलेली, म्हणून सतत चिडचिड करणाऱ्या स्त्रीचा रोल अमृताने अतिशय उत्कृष्टरित्या निभावला भावला होता.

The New York Times praised Amrita’s role in the movie Dhamaka

गली बॉय या सिनेमानंतर तीने बऱ्याच वेब सीरिजमध्ये आणि सिनेमांमध्ये अतिशय उत्कृष्ट काम करून आपल्या अभिनयाची कौशल्याची वेळोवेळी झलक दाखवली आहे. नुकताच तिचा धमाका हा सिनेमा नेटफ्लिक्स वर प्रदर्शित झाला होता. या सिनेमामध्ये टीआरपीसाठी काहीही करण्यास तयार असणाऱ्या, एका सुपर हिलेरियस बॉसचा रोल तिने निभावला होता. तर न्यूयॉर्क टाइम्स ने तिने साकारलेल्या या भूमिकेचे कौतुक केले आहे. 1976 मध्ये प्रदर्शित झालेल्या नेटवर्क सिनेमा मध्ये फे डनवे हिने निभावलेल्या रोलसाठी तिला त्यावर्षीचा अकॅडमी अवॉर्ड मिळाला होता. आणि योगायोग मध्ये याचवर्षी अमृता सुभाषचा जन्म झाला होता. अमृताने तिच्या इंस्टाग्रामवर अकाऊंटवर एक पोस्ट शेअर करत ही बातमी तिच्या चाहत्यांना दिली आहे.


कार्तिक आर्यनची प्रमुख भूमिका असणारा ‘धमाका’ चित्रपट दाखवण्यात आला IFFI 2021 मध्ये


न्यूयॉर्क टाइम्सने केलेल्या तिच्या या कामाच्या कौतुकामुळे अमृता सध्या प्रचंड खूश आहे. नुकताच तिला बॉम्बे बेगम या वेब सीरिजमधील तिच्या भूमिकेसाठी ओटीटी फिल्मफेअर अवॉर्ड मिळाला आहे.

The New York Times praised Amrita’s role in the movie Dhamaka

 

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    शिंदे – फडणवीसांची समृद्धी महामार्गावर टेस्ट ड्राईव्ह मोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो! मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण