फॅन्ड्री फेम जब्या ऊर्फ सोमनाथ अवघडेचे चित्रपटसृष्टीत पुनरागमन! तानाजी गालगुंडे आणि सोमनाथ अवघडे यांचा ‘फ्री-हीट दणका’ लवकरच होणार रिलीज

विशेष प्रतिनिधी

मुंबई : सुनील मगरे यांच्या नवीन चित्रपटात तब्बल आठ वर्षांनी सोमनाथ अवघडे दिसणार आहे. यात अपुर्वा त्याच्या बरोबर प्रमुख भुमिकेत दिसेल १७ डिसेंबरला फ्री-हीट दणका ( २०२१ ) चित्रपट प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात तब्बल सात वर्षांनतर सोमनाथ अवघडे दिसणार आहे.

Somnath Avaghade and Tanaji Galgunde starring free hit Danka to release on १७ September

सुनिल मगारे हा चित्रपट दिग्दर्शित करणार आहेत. त्यांचा हा पहिलाच चित्रपट आहे. फ्रि हिट दणकामध्ये तानाजी गालगुंडे, अरबाज शेख, सुरेश विश्वकर्मा यांच्याही भूमिका आहेत. हा सिनेमा १६ एप्रिलला प्रदर्शित होणार होता. परंतु कोविड १९च्या कारणामुळे तो प्रदर्शित झाला नाही.


मराठी चित्रपटसृष्टीत पहिल्यांदाच होणार असा प्रयोग. ‘तमाशा लाइव्ह’ या संगीतमय चित्रपटामध्ये अभिनेत्री सोनाली कुलकर्णी साकारणार मुख्य भूमिका.


मगारे यांनी फेसबुक वरील पोस्टमधे प्रदर्शनाची तारीख जाहीर केली आहे. चित्रपटाच्या पोस्टर वरून असे दिसतेय की हा चित्रपट क्रिकेट सामन्यावर आधारित आहे. सोमनाथ आणि अपुर्वा चा फोटो एक प्रेमकहाणी सांगतो. तसेच मागे दिसणारे गालगुंडे, शेख, विश्वकर्मा हातात टेनिस बॉल, क्रिकेट बॅट आणि स्टम्पस सह दिसत आहेत. अवघडे, शेख, गालगुंडे यांनी घातलेल्या जर्सीवरून ते एकाच टिमचे खेळाडू असावेत. महत्वाचे म्हणजे नागराज मंजुळे दिग्दर्शित फॅन्ड्री मधून या तिघांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली होती.

फ्रि हिट दणका हा चित्रपट तरुणांच्या घट्ट मैत्रीवर आधारीत आहे. मगारे यांनीच या चित्रपटाची कथा व पटकथा लिहिली आहे. अशोक ठोंबरे, मगारे आणि मेघनाथ सोरखडे हे निर्माते आहेत.

Somnath Avaghade and Tanaji Galgunde starring free hit Danka to release on 17 September

 

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात