विशेष प्रतिनिधी
दिल्ली : 2015 मध्ये नेटफ्लिक्सवर रिलीज झालेली फॉडा ही सीरिज जगातल्या सर्वोत्तम सिरीजपैकी एक आहे. फॉडा हा अरेबिक शब्द आहे. फॉडा म्हणजे गोंधळ. इस्रायल आणि पॅलेस्टाइन यांच्यातील कॉन्फ्लिक्टवर आधारित ही सीरीज आहे. लिओर राझ आणि अवी इसचारौफ या दोघांनी या सीरिजचे लेखन केले आहे. तर सीरिजचे निर्मातेदेखील हे दोघे आहेत. पैकी लिओर राझ यांने या सीरिजमध्ये लीड कॅरेक्टर ‘डोरॉन अविलिओ’ प्ले केले आहे.
Shooting of the fourth season of Fauda series begins!
लिओर आणि अवि हे दोघेही इस्रायली संरक्षण दल (IDF) सोबत काम केले होते. आपल्या लष्करातील अनुभवामुळे त्यांना ही मालिका लिहिण्यात आणि याला चांगला आकार देण्यामध्ये मदत झाली आहे. असे त्या दोघांनी सांगितले होते.
2020 मध्ये या सीरिजचा तिसरा सिझन प्रदर्शित झाला होता. पण कोरोनामुळे चौथ्या सीझनचे शूट करण्यास उशीर झाला होता. आता चौथ्या सीझनचे शूटिंग चालू आहे. तर भारतातील फॉडा सिरीजच्या फॅन्ससाठी एक आनंदाची बातमी आहे.
https://www.instagram.com/p/CVunpUDMMuY/?utm_source=ig_web_copy_link
‘हाऊस ऑफ सिक्रेट्स’ बुरारी डेथ केसवर आधारित ही नेटफ्लिक्स सिरीज सर्वांचे लक्ष का वेधून घेतीये?
भारतातील इस्रायलचे अॅम्बॅसिडर यांनी फॉडा सीरिजची भारतातील प्रसिद्धी ओळखून सीरिजच्या मेन कास्टपैकी एका कलाकाराला भारतात आणण्याचे प्रॉमिस केले आहे. ANI या न्यूज एजन्सीसोबत बोलताना त्यांनी हे विधान केले होते.
ही सीरिज इस्रायली आणि पॅलेस्टीनी दोन्ही बाजुतील भावविश्वावर त्यांच्या परिस्थितीवर प्रकाश टाकणारी सीरीज आहे. त्यामुळे ही सीरिज इस्रायल आणि पॅलेस्टाइन दोन्ही देशांमध्ये तितक्याच आवडीने पाहिली जाते. सोबतच ही सीरिज जगात जगभर फेमस आहे. नुकताच नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झालेल्या हिट अॅन्ड रन या मूव्हीमध्ये लिओर राझ याने लीड कॅरेक्टर प्ले केले होते. जर तुम्ही ही सिरीज पाहिली नसेल तर नक्की पाहा.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App