विशेष प्रतिनिधी
मुबंई : विकी कौशल यांची प्रमुख भूमिका असणारा सरदार उधम सिंग हा सिनेमा नुकताच अमेझॉन प्राईम या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाच्या प्रदर्शनानंतर बऱ्याच मिक्स प्रतिक्रिया प्रेक्षकांमधून ऐकण्यास मिळत आहेत. तर आयएमडीबी ने या सिनेमाला 9.2 रेटिंग दिले आहे.
Sardar Udham Singh movie review
13 एप्रिल 1919 हा दिवस भारतीय इतिहासातील एक काळा दिवस म्हणून लिहिला गेला आहे. या दिवशी अमृतसर येथील जालियनवाला बागमध्ये 1000 पेक्षा जास्त लोक असलेल्या जमावावर इंग्रजांनी कोणत्याही कारणाशिवाय गोळीबार केला होता. या हत्याकांडामध्ये स्त्री, पुरुष, लहान मुले, वयस्कर लोक मृत्यूच्या थारोळ्यात पडून होते. नेमके किती लोक मृत्युमुखी पडले हे आजवरही आपण मोजू शकलो नाहीये.
या घटनेची पडसाद साऱ्या भारतभर उमटले होते. इंग्रजांविरूध्द असंतोष उफाळून आला होता. सरदार उधम सिंग हे त्यापैकीच एक होते. 14 व्या वर्षापासून ते अनाथ म्हणूनच जगले. जालियनवाला बाग हत्याकांड त्यांनी स्वत: च्या डोळ्यांनी पहिला. तेथील मृत्यूतांडव त्यांनी पाहिला होता. रक्ताच्या थारोळ्यात पडलेले मृतदेह पाहिले होते. कारण काय? तर फक्त एका सणकी इंग्रजी अधिकाऱ्यांची इच्छा. याच घटनेचा बदला घेण्यासाठी शेरसिंग ऊर्फ उधमसिंग लंडनला गेले.
Sooryavanshi Movie : ये दिवाली अक्षय वाली ! अक्षय कुमारचा ‘सूर्यवंशी’ दिवाळीत करणार धमाका ; 5 नोव्हेंबरला होणार रिलीज!
तिथे सहा वर्ष त्यांनी या घटनेचा बदला घेण्यासाठीच प्रयत्न चालु ठेवले. लंडनमध्ये गेल्यानंतर त्यांचे आयुष्य काही सोपे नव्हते. तिथे गेल्यानंतर रस्त्यावर कपडे विकण्यापासून ते फॅक्टरीमध्ये वेल्डिंगचे काम देखील त्यांनी केले. अशी छोटी मोठी कामे करून त्यांनी आपला उदरनिर्वाह केला. तेथील भारतीयांना ते भेटले. शस्त्र मिळवले. आणि पूर्ण तयारीनिशी निडर पणे प्रेस कॉन्फरन्समध्ये सर्वांदेखत त्या अधिकाऱ्यावर गोळ्या घालत्या आणि बदला घेतला.
या घटनेवर आधारित सुजीत सरकार यांनी सरदार उधम सिंग हा सिनेमा बनवला आहे. सुजीत सरकार हे नाव सिनेमा बनवण्यात एक प्रो मानले जाणारे नाव आहे. त्यांनी हा सिनेमा अतिशय बारकाईने बनवला आहे. चित्रपटातील सेट्स इतक्या बारकाईने बनवले आहेत की आपण त्या काळामधील लंडनमध्ये आपोआप जाऊन पोहोचतो. सिनेमातील डायलॉग्ज लेखकाने अतिशय उत्कृष्टरीत्या लिहिले आहेत. शब्द आणि शब्द सांभाळून आणि उत्कटरीत्या लिहिले गेले आहेत.
1933 सालचे लंडन आपल्या डोळ्यादेखत उभे करणे हे काही सोपे काम अजिबात न्हवते. सिनेमाच्या प्रॉडक्शन टीमने ही जबाबदारी अतिशय उत्कृष्ट रित्या निभावली आहे. सुजित सरकार यांच्या व्हिजनची दाद पुन्हा एकदा द्यावी लागेल. विकी कौशल हा रोल अक्षरशः जगला आहे. असे सिनेमातील प्रत्येक सिन पाहिले की लक्षात येण्यासारखे आहे. लाडू प्रेमी, हुशार, भावनिक, प्रवाही उधम सिंग विकि कौशलने अतिशय सुंदर रित्या निभावला आहे. सिनेमा पहिल्या नंतर आपण बराच वेळ 1933 च्या जमान्यात आहोत असाच भास होत राहतो.
सिनेमा फ्लॅशबॅक मध्ये बऱ्याच वेळा घेऊन जातो. एक घटना आणि त्याचा भूतकाळातील रेफरन्स लगेच दिला जातो. ह्या सिनेमात भगत सिंग आणि उधम सिंग ह्या दोघांच्या मैत्रीवरही प्रकाश टाकण्यात आला आहे. सिनेमा मध्ये प्रत्येक घटना अतिशय बारकाईने दाखवली असल्याने सिनेमाचा वेळ थोडाफार लांबला आहे.
हा सिनेमा त्या लोकांसाठी अजिबात नाही ज्यांना सिनेमाच्या सुरुवातीला भरपूर गाणी आणि सुंदर दृश्ये पाहण्याची आणि क्षणात फील गुड फिलिंग यावी ही अपेक्षा ठेऊन सिनेमा पाहतात. ह्या सिनेमाच्या शेवटचा सिन तुम्ही अक्षरशः जगाता. दिग्दर्शक 2 मिनिटं मध्ये हा सिन संपवू शकले असते. पण त्यांनी प्रेक्षकांना हा सिन जगण्यासाठी मुभा आणि वेळ दिली आहे. ही वेळ सिनेमाला एका वेगळ्याच उंचीवर घेऊन जाते. उधम सिंग हा सिनेमा सर्वांनी पाहावा असा एक उत्कृष्ट सिनेमा आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App