
विशेष प्रतिनिधी
मुबंई : मराठी अभिनेता रितेश देशमुख लवकरच दिग्दर्शन क्षेत्रात आपले पदार्पण करणार आहे. 12 ऑगस्ट 2022 रोजी त्याचा हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. वेड असे या सिनेमाचे नाव आहे. या चित्रपटामध्ये रितेश देशमुख, त्याची पत्नी आणि अभिनेत्री जेनेलिया, जिया शंकर, अशोक सराफ आणि शुभंकर तावडे एका प्रमुख भूमिकेमध्ये दिसून येणार आहेत. जेनेलिया तब्बल 10 वर्षांनंतर अभिनय क्षेत्रामध्ये पदार्पण करत आहे. त्यामुळे तिचे चाहते या बातमीनंतर प्रचंड एक्सायटेड आहेत.
Ritesh Genelia to appear in new movie, Ritesh Deshmukh makes his directorial debut
रितेश देशमुख या चित्रपटांमध्ये अॅक्टिंग करणार आहे. तो दिग्दर्शन करणार आहे. त्याचप्रमाणे या चित्रपटाचा निर्माता देखील तोच आहे. त्यामुळे तिहेरी भूमिका साकारताना रितेश देशमुख आपल्याला पाहायला मिळणार आहे.
हिंदू धर्माच्या सणावेळीच ज्ञान का? नेटकाऱ्यांच्या ह्या प्रश्नावर रितेश देशमुखने काय उत्तर दिले?
अजय अतुल यांनी या चित्रपटाचे संगीत विभाग सांभाळले आहे. तर मुंबई फिल्म्स द्वारा या चित्रपटाची निर्मिती केली जात आहे. या चित्रपटाचे पोस्टर जेनेलियाने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले आहे. निळ्याशार पाण्यामध्ये एक बोट आणि बोटवर निवांत पहुडलेला एक माणूस दिसतोय. ह्या पोस्टरमुळे या चित्रपटाची कथा अतिशय भन्नाट असणार असे वाटत आहे.
Ritesh Genelia to appear in new movie, Ritesh Deshmukh makes his directorial debut
महत्त्वाच्या बातम्या
- मेंदूचा शोध व बोध : सततच्या रागाला शक्य तितके लवकर रोखा
- जनरल बिपिन रावत : गढवाली रजपूत शौर्य परंपरेतले आक्रमक नेतृत्व!!; लष्करी आधुनिकीकरणाचे, सुधारणांचे अध्वर्यू!!
- विज्ञानाचे डेस्टीनेशन्स : नव्या वायफायमुळे जग होणार वेगवान
- Bipin Rawat Helicopter Crash : लष्करप्रमुख होण्याआधीही बिपिन रावत यांचा झाला होता अपघात, थोडक्यात वाचले होते प्राण