रकुल प्रीत सिंग तिच्या आगामी ‘छत्रीवाली’ सिनेमात निभावणार ‘कंडोम टेस्टर’ची भूमिका


विशेष प्रतिनिधी

मुबंई : रोनी स्क्रूवाला एका नव्या चित्रपटाची निर्मिती करत आहेत. रकुल प्रीत या चित्रपटामध्ये प्रमुख भूमिकेमध्ये दिसणार आहे. या चित्रपटाचे नाव आहे ‘छत्रीवाली’. अतिशय वेगळ्या आणि महत्वाच्या विषयावर हा सिनेमा असणार आहे.

Rakul Preet Singh will play the role of a condom tester in her upcoming movie ‘Chhatriwali’

राकुल प्रीत सिंगने या सिनेमामध्ये ‘कंडोम टेस्टर’ ची भूमिका साकारली आहे. छोट्या शहरात राहणारी, नोकरी करण्यासाठी उत्सुक असणारी, केमिस्ट्री ग्रॅज्युएट मुलगी. पण काही कारणाने तिला अजिबातच नोकरी मिळत नाही. तेव्हा मजबुरीने तिला कंडोम टेस्टर हा जॉब घ्यावा लागतो. अशी या सिनेमाची कथा असणार आहे.


देशभरातून परतणाऱ्या मजुरांना बिहार सरकारची कंडोम भेट


या चित्रपटाची संकल्पना अतिशय उच्च दर्जाची आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शक तेजस प्रभा विजय देऊस्कर या चित्रपटाबद्दल सांगताना म्हणतात, आमचा चित्रपट हा सामाजिक कौटुंबिक मनोरंजन करणारा चित्रपट असणार आहे. कंडोमचा विषय आजही मोकळेपणानं बोलला जात नाही. त्यामुळे अतिशय संवेदनशील असणाऱ्या या विषयावर प्रत्येकाला विचार करायला भाग पाडेल असा संदेश देणारा आम्ही सिनेमा बनवत आहोत. असे या दिग्दर्शकाने सांगितले आहे.

राकुल प्रीत सुद्धा या चित्रपटातील तिच्या हटक्या रोलमुळे एक्सायटेड आहे. ह्या चित्रपटाचे शूटिंग लखनउ येथे सुरू झाले आहे. भारतातील लोकांच्या आयुश्यावर चित्रपटांचा मोठा प्रभाव असतो. तेव्हा असे आरोग्याच्या दृष्टीने हिताचे आणि सहन बोलले न जाणार्या विषयांवर सिनेमे बनवने हे गरजेचे आहे. इथे प्रत्येक जन पुस्तक आणि बातमी वाचत नाही पण सिनेमा पाहतो अश्या देशात आपण राहतो. तेव्हा हा सिनेमा मनोरंजना सोबत मोलाची शिकवण देणारा असणार आहे.

Rakul Preet Singh will play the role of a condom tester in her upcoming movie ‘Chhatriwali’

 

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण भारतात आता एक देश एक चार्जर जलयुक्त शिवार योजना पुन्हा चालू होणार; शिंदे – फडणवीस सरकारचा महत्त्वाचा निर्णय