विशेष प्रतिनिधी
मुंबई : नुकताच शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याला ड्रग केसमध्ये संभाव्य आरोपी म्हणून अटक करण्यात आली आहे. इंटरनॅशनल ड्रग्ज स्मगलिंग ऍण्ड पेडलिंग मध्ये त्याचा सहभाग असण्याची शक्यता एनसीबीने वर्तवली आहे. त्या संदर्भात सखोल चौकशी करण्यासाठी आर्यनला 14 दिवसांची पोलिस कोठडी देखील सुनावण्यात आली आहे. या पाश्र्वभूमीवर बॉलीवूडमधील बऱ्याच अभिनेत्यांनी, दिग्दर्शकांनी शाहरुख खान आणि त्याच्या फॅमिलीला आपला सपोर्ट ट्विटरच्या माध्यमातून ट्विट करून दर्शवला आहे. आता या यादीमध्ये आणखी एक नाव ऍड झाले आहे. सोमी अली.
I have tried pot with divya bharti : Somi Ali
आर्यनला सपोर्ट करताना सोमीने स्वतःच्या आयुष्यातील अनुभव शेअर केले आहे. ती म्हणते की, मी जेव्हा मी 15 वर्षांची होते तेव्हा दिव्या भारती सोबत पॉट ट्राय केले होते. आणि ते लहानपणाच काय जिथे मुलांनी ड्रग्ज ट्राय केले नाहीत? ड्रग्जचा प्रॉब्लेम आता वेश्या व्यवसायासारखा झाला आहे. कितीही मुळापासून नष्ट करण्याचा प्रयत्न केला, तरी समाजातून हे प्रश्न सुटणे कठीण आहे. हे प्रश्न सुटण्यासाठी बराच कालावधी जावा लागेल. 1971 पासून अमेरिकेमध्ये ड्रग्ज हटाव मोहीम सुरू आहे. पण आजही तिथे ड्रग सहज उपलब्ध होतात.
Aaryan Khan Drugs Case : आर्यन खानला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी ; जामिनासाठी अर्ज करण्याचे कोर्टाचे आदेश
पुढे ती असंही म्हणते की, आर्यनला फक्त एक मुद्दा बनवून वापरले जात आहे. त्यापेक्षा भारतीय न्यायव्यवस्थेने रेपिस्ट आणि मर्डर करणाऱ्या लोकांना पकडणे गरजेचे आहे. असे तिचे म्हणणे आहे. आपल्या ट्विटर अकाउंट वरून ट्विट करत तिने शाहरुख खान आणि त्याच्या फॅमिलीला आपला सपोर्ट दर्शवला आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App