काँग्रेसच्या स्टार कॅम्पेनर यादीत कन्हैया कुमार, सचिन पायलटसह जी 23 मधील आनंद शर्मांचाही समावेश


वृत्तसंस्था

नवी दिल्ली : लोकसभेच्या आणि विधानसभेच्या 60 हून अधिक जागांसाठी 30 ऑक्टोबर रोजी पोटनिवडणुका होत आहेत. या पोटनिवडणुकीसाठी काँग्रेसने स्टार कॅम्पेनरची यादी जाहीर केली आहे. यामध्ये नुकताच भारतीय कम्युनिस्ट पक्षातून काँग्रेसमध्ये प्रवेश केलेला विद्यार्थी नेता कन्हैया कुमार याचा समावेश स्टार कॅम्पेनरच्या यादीत काँग्रेसने केला आहे.Congress star campaigners includes Kanhaiya Kumar, Sachin Pilot and Anand Sharma from G23

या यादीतले सगळ्यात पहिले नाव छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांचे आहे. त्यांच्याकडे उत्तर प्रदेशाच्या प्रभारी पदाची जबाबदारी काँग्रेसने नुकतीच सोपविली आहे. त्यांच्या खालोखाल पंजाबचे मुख्यमंत्री चरणजीत सिंग चन्नी यांना स्थान देण्यात आले आहे. त्याचबरोबर जी 23 मधील नेते आनंद शर्मा यांचादेखील स्टार कॅम्पेनरच्या यादीत समावेश करण्यात आला आहे.पंजाबच्या मुख्यमंत्रीपदावरून कॅप्टन अमरिंदरसिंग यांना घालविणारे प्रदेशाध्यक्ष नवज्योत सिंग सिद्धू यांनादेखील स्टार कॅम्पेनरच्या यादीत स्थान देण्यात आले आहे. एकूण 20 जणांची ही यादी आहे. येत्या आठवडाभरापासून हे स्टार कॅम्पेनर पोटनिवडणुका असलेल्या मतदारसंघांमध्ये जाऊन काँग्रेसचा प्रचार करतील.

बऱ्याच दिवसांपासून नाराज असलेले राजस्थान काँग्रेसचे नेते तरुण नेते सचिन पायलट हे देखील या पोटनिवडणुकीत काँग्रेसच्या स्टार कॅम्पेनर आहेत. गेल्या काही दिवसांपासून त्यांची राहुल आणि प्रियांका गांधी यांच्याशी जवळीक वाढली असल्याचे बोलले जात आहे.

राजस्थानमध्ये नेतृत्व बदलाच्या चर्चा जोर धरत असताना त्यांच्या राहुल आणि प्रियांका गांधी यांच्या भेटीगाठी वाढल्या आहेत. आता त्यांचे नाव स्टार कॅम्पेनरच्या यादीत समाविष्ट केल्याने पुन्हा एकदा सचिन पायलट यांच्या नावाची काँग्रेसच्या वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

Congress star campaigners includes Kanhaiya Kumar, Sachin Pilot and Anand Sharma from G23

महत्त्वाच्या बातम्या

 

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    नितीन गडकरींकडून संत तुकाराम महाराज पालखी मार्गाची हवाई पाहणी अभिमानास्पद! जगातील पहिला ‘बांबू क्रॅश बॅरियर’ महाराष्ट्रातील महामार्गावर ”महाराष्ट्राच्या राजकारणाचा चिखल झाला आहे.”