विशेष प्रतिनिधी
मुंबई : लग्न ही प्रत्येकाच्या आयुष्यातील एक अतिशय महत्त्वाची घटना असते. लग्न करण्याच्या आजकाल बऱ्याच पध्दती आहेत. बीच वेडिंग, डेस्टिनेशन वेडिंग, फोर्ट वेडिंग, रिसॉर्ट वेडिंग अशा अनेक लग्नाच्या थीम्स सध्या पाहायला मिळतात. लग्नामध्ये कुणी सेलिब्रिटी आले तर त्या लग्नाची आणि ज्यांचे लग्न होणार आहे त्यांची शान काही वेगळीच असते. पण तुम्हाला माहितीये का? आपले बॉलीवूड सेलिब्रेटी लग्नामध्ये फक्त दहा ते पंधरा मिनिटांचा अपियरन्स देण्यासाठी किती पैसे घेतात? चला तर पाहूया.
How much these Bollywood celebrities charge for attending a wedding?
1. प्रियांका चोप्रा, ऋतिक रोशन, अक्षय कुमार : देसी गर्ल प्रियांका चोप्रा, हँडसम हंक हृतिक रोशन आणि खिलाडी अक्षय कुमार हे प्रत्येकी कोणत्याही लग्नाच्या कार्यक्रमात हजेरी लावण्यासाठी 2 कोटी 50 लाख रुपये घेतात.
2. रणबीर कपूर : सावरिया चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पदार्पण केलेला क्युटी पाय रणबीर कपूर कोणत्याही लग्न कार्यक्रमात हजेरी लावण्यासाठी 2 कोटी रुपये मानधन म्हणून घेतो.
3. दीपिका पदुकोण : बॉलीवूडची क्वीन म्हणून ओळखली जाणारी, दीपिका पदुकोण ही आजवरची सर्वात यशस्वी अभिनेत्री आहे. तिने स्वत:च्या नावावर अनेक हिट सिनेमे दिलेले आहेत. कोणत्याही लग्न कार्यक्रमात हजेरी लावण्यासाठी ती 1 कोटी इतके मानधन घेते.
कॅटरिना विकीच्या लग्नातील खास फोटो शूट, कॅटरिनाची साडी बनवायला 40 कारागिरांना 1800 तास लागले
4. रणवीर सिंग : आपल्या तुफान अभिनयाने आणि खतरनाक लुक्सने सर्वांना घायाळ करणारा बॉलीवूडचा बाजीराव म्हणजेच रणवीर सिंह. लग्न कार्यक्रमात हजेरी लावण्यासाठी तो 1 कोटी रूपये मानधन म्हणून घेतो.
5. कॅटरिना कैफ : नुकतीच विवाहबंधनात अडकलेली कॅटरिना कैफ लग्न समारंभात हजर राहण्यासाठी सर्वात जास्त मानधन घेते. 3 कोटी 50 लाख रुपये ती कार्यक्रमात हजेरी लावण्यासाठी घेते.
6. शाहरुख खान : बॉलीवूडचा किंग म्हणून ओळखला जाणारा शाहरुख खान कोणत्याही लागण्यात हजर राहण्यासाठी जवळपास 3 कोटी रुपये मानधन म्हणून घेतो.
7. सलमान खान : दबंग सलमान खान म्हणजेच आपला भाईजान लग्न कार्यक्रमात हजेरी लावण्यासाठी 2 कोटी रुपये मानधन घेतो.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App