विशेष प्रतिनिधी
मुबंई : तुम्ही नेटफ्लिक्सवरील ‘मनी हाईस्ट’ या सीरिजचे चाहते आहात? तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. अब्बास मस्तान या सीरिजचे देसी व्हर्जन बनवणार आहेत अशीच चर्चा सध्या रंगली आहे.
Hindi movie based on Money High series is coming? Arjun Rampal to play the role of Professor?
मनी हाईस्ट ही एक स्पॅनिश सीरीज आहे. या सीरिजचा पहिला सीझन संपूर्ण जगभर गाजला होता. दहा वर्षांपासून सुरू असणारी चोरीची तयारी आणि त्यानंतर जगातली सर्वात मोठी चोरी. यावर आधारित ही सीरिज होती.
मनी हाइस्ट सिरीज सिझन ५ वोल्युम २ चा ट्रेलर प्रदर्शित परंतु चाहतावर्ग या ट्रेलरसाठी तयार नाही
तर देशी मनी हाईस्ट सिनेमाचे कास्टिंग देखील सुरू झाल्याची चर्चा सध्या चांगली रंगली आहे. तर कोण कोणता रोल करणार? प्रोफेसरच्या रोलसाठी अभिनेता अर्जुन रामपालच्या नावाची चर्चा सध्या सुरू आहे. अर्जुन रामपाल हा बॉलीवूडमधील वन ऑफ द सेक्सिएस्ट अभिनेता आहे. प्रोफेसरचा रोल करणारे अल्वारो मारटो हे एक स्पॅनिश अभिनेता आहेत. सेल्फ कंटेंड, नर्ड, इंट्रोव्हर्ट टाइप प्रोफेसरचे चाहते अख्ख्या जगभर पसरलेले आहेत. त्यामुळे अर्जुन रामपाल या रोलमध्ये कितीसा चांगला दिसेल हे आता आगामी काळात आपल्याला कळेलच. मागे आयुष्यमान खुरणाने आपल्या इंस्टा अकौंटवर एक व्हिदिओ शेअर करत सांगितले होते कि त्याला प्रोफेसर सारखे रोल प्ले करायला आवडतील. आता अब्बास मस्तान ह्या रोल साठी कोणाची निवड करतात हे पाहूया.
देसी व्हर्जन मनी हाईस्टचे नाव ‘थ्री मंकीज’ असणार आहे. अब्बास मस्तान यांचा मुलगा याच्या मधील एक रोल प्ले करणार आहे. तर बाकी दोन चोरांचे रोल कोण प्ले करणार याबद्दल अजून चर्चा सुरू आहे. 2022 च्या मध्याला हा चित्रपट रिलीज होणार असे म्हटले जात आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App