विशेष प्रतिनिधी
स्पेन : मनी हाईस्ट या जगप्रसिद्ध सिरीजचा शेवटचा सिजन डिसेंबरमध्ये प्रदर्शित होणार आहे. ह्या सिरीजच्या चाहत्यांसाठी मात्र ही प्रचंड दु:खद घटना आहे की त्यांच्या फेव्हरेट शो चे पुढचे सीझन आता येणार नाहीत. मनी हाईस्ट या सीरिजमुळे प्रोफेसर हे कॅरेक्टर जरी प्रसिद्ध झाले असले तरी बर्लिन हे कॅरेक्टर मात्र पहिल्या सिझनपासून शेवटचा सिझन पर्यंत तितकेच प्रसिद्ध आहे. 2ऱ्या सीझनमध्येच बर्लिनचा मृत्यू झाला असे दाखवण्यात आले होते. तरीही शेवटच्या सिजण पर्यंत बर्लिन फ्लॅशबॅकमध्ये दाखवला जातो, कारण त्याची प्रसिद्धी.
Good news for Berlin fans: Berlin will appear in another Netflix show after money heist
तर नेटफ्लिक्स तर्फे आता ही घोषणा केली गेली आहे की, बर्लिन या पात्राला सेंटर कॅरेक्टरमध्ये ठेवून लवकरच एक नवीन शो 2023 मध्ये सुरू करण्यात येणार आहे. त्यामुळे मनी हाईस्ट आणि बर्लिनच्या चाहत्यांसाठी ही एक आनंदाची गोष्ट आहे.
मनी हाइस्ट सिरीज सिझन ५ वोल्युम २ चा ट्रेलर प्रदर्शित परंतु चाहतावर्ग या ट्रेलरसाठी तयार नाही
कोल्ड सोशियोपॅथ, अनप्रेडीक्टेबल, इंटेलिजंट बर्लिन हा प्रेक्षकांना अतिशय भावून गेला होता. शेवटच्या सीजनमध्ये त्याचे तातीया सोबतचे लग्न, त्यांचा मुलगा पुन्हा दिसणार आहेत. बँक ऑफ स्पेन ही हाईस्ट बर्लिननेच प्लॅन केलेली होती. आणि तो हा प्लॅन आपला भाऊ प्रोफेसर आणि पालेर्मो यांना सांगतो. त्यामुळे हाईस्टचा मास्टरमाइंड बर्लिनच आहे म्हणायला हरकत नाही. आता नवीन शो कधी येतोय हीच त्याच्या चाहत्यांना प्रतीक्षा असणार.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App