विशेष प्रतिनिधी
न्यूयॉर्क : पोर्तुगाल आणि मँचेस्टर युनायटेडचा स्टार फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डोने नुकताच गुड न्युज दिली आहे. तो जुळ्या मुलांचा बाप होणार आहे. 36 वर्षीय रोनाल्डोने इंस्टाग्रामवर त्याची गर्लफ्रेंड जॉर्जिना रॉड्रिग्जसोबतचा एक फोटो शेअर करून चाहत्यांना ही आनंदाची बातमी दिली आहे.
Cristiano Ronaldo’s ‘This’ photo gets the most likes on Instagram to date
तर मुख्य बातमी अशी की, क्रिस्टियानो रोनाल्डोच्या या फोटोला 27.1 मिलियन म्हणजेच सुमारे 2 कोटी 71 लाख लाईक्स मिळाले आहेत. इंस्टाग्रामवर आजपर्यंत कोणत्याही फोटोला इतके लाईक्स मिळालेले नाहीयेत. रोनाल्डो हा इंस्टाग्रामवर सर्वाधिक फॉलो केल्या जाणाऱ्या व्यक्तींपैकी एक व्यक्ती आहे. त्याच्या इंस्टाग्रामवर 360 दशलक्ष इतके फॉलोअर्स आहेत.
FACEBOOK : आता फेसबुकचे नाव बदलणार , मार्क झुकरबर्ग लवकरच घोषणा करणार
सर्वाधिक लाइक्स मिळालेल्या ह्या फोटोत तो त्याच्या गर्ल फ्रेंड सोबत दिसून येतोय. आणि त्याच्या हातात सोनोग्राफी रिपोर्ट होता. त्याचा हा फोटो चाहत्यांना इतका आवडला की या फोटोने लाईक्सचे सर्व रेकॉर्ड मोडले आहेत. रोनाल्डोला 2017 जुळी मुले झाली होती. त्यांची नावे इवा आणि माटेओ आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App