Katrina Kaif Corona positive : महाराष्ट्रात कोरोनाच्या दुसरी लाटेत मोठ्या प्रमाणात संसर्ग पसरलेला आहे. अनेक दिग्गज बॉलीवूड कलाकारांना यापूर्वी कोरोनाची लागण झालेली आहे. आता अभिनेत्री कॅटरिना कैफलाही कोरोनाचा संसर्ग झाल्याची बातमी समोर आली आहे. ही माहिती खुद्द कॅटरिनाने आपल्या इन्स्टाग्राम हँडलवरून शेअर केली. Bollywood Actress Katrina Kaif Corona positive, shared by herself on social media
विशेष प्रतिनिधी
मुंबई : महाराष्ट्रात कोरोनाच्या दुसरी लाटेत मोठ्या प्रमाणात संसर्ग पसरलेला आहे. अनेक दिग्गज बॉलीवूड कलाकारांना यापूर्वी कोरोनाची लागण झालेली आहे. आता अभिनेत्री कॅटरिना कैफलाही कोरोनाचा संसर्ग झाल्याची बातमी समोर आली आहे. ही माहिती खुद्द कॅटरिनाने आपल्या इन्स्टाग्राम हँडलवरून शेअर केली.
कॅटरिनाने इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये लिहिले की, ‘माझा रिपोर्ट कॉरोना पॉझिटिव्ह आला आहे, मी स्वत:ला विलगीकरणात ठेवले आहे. यापूर्वी माझ्या संपर्कात आलेल्या सर्व लोकांना मी विनंती करते की त्यांनी आपली टेस्ट करून घ्यावी. आपल्या प्रेम आणि सहकार्याबद्दल सर्वांचे आभार. सुरक्षित राहा आणि काळजी घ्या.’
अभिनेत्री कॅटरिना कैफच्या इन्स्टाग्राम स्टोरीचा स्क्रीनशॉट.
दरम्यान, यापूर्वी चित्रपटसृष्टीतील अनेक तारे-तारकांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. यात अक्षय कुमार, विक्की कौशल, भूमी पेडणेकर, गोविंदा आणि इतरांचा समावेश आहे.
कॅटरिनाचा आगामी ‘सूर्यवंशी’ कोरोनामुळे अद्याप रिलीज होऊ शकलेला नाही. या चित्रपटात कॅटरिनासोबत अक्षय कुमार मुख्य भूमिकेत असणार आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन रोहित शेट्टी याने केले आहे.
Bollywood Actress Katrina Kaif Corona positive, shared by herself on social media
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App