नियमांचं काटेकोर पालन केल्यास कोरोना महिन्यात नियंत्रणात ; कोव्हिड 19 टास्क फोर्सच्या सदस्यांचा आत्मविश्वास


वृत्तसंस्था

मुंबई : लोकांनी कोरोनासंबंधी नियमांचं नीट पालन केले तर कोरोनाची प्रकरणं दोन ते चार आठवड्यांतच कमी होऊ शकतात, असा सल्ला कोव्हिड 19 टास्क फोर्सच्या सदस्यांनी दिला. कोरोनाला रोखण्यासाठी हा एक प्रभावी मार्ग असल्याचे त्यांनी सांगितले आहे.Corona months under control if the rules are strictly followed; Confidence of Covid 19 Task Force members

राज्यात कोरोनाची प्रकरणं दिवसेंदिवस वाढत आहेत. त्यामुळे राज्य सरकारबरोबरच केंद्र सरकारचंही टेन्शन वाढलं आहे. कोरोनाला नियंत्रित करण्यासाठी केंद्राच पथक राज्यात पाठवले आहे.दुसरी लाट अधिक संसर्गजन्य

कोरोनाची दुसरी लाट अधिक संसर्गजन्य आहे. पण गंभीर नाही, असं सदस्य शशांक यांनी सांगितलं. कोरोनाची प्रकरणं दोन ते चार आठवड्यांतच कमी होऊ शकतात. पण त्यासाठी लोकांनी कोरोनासंबंधी नियमांचं नीट पालन करायला हवं. लसीकरणामुळे आजार आणि मृत्यूपासून संरक्षण मिळेल. पण, संसर्गापासून नाही, असं त्यांनी सांगितलं.

लसीकरणावर अधिक भर द्यावा

जास्तीत जास्त लोकांचं लसीकरण कराव. पुढील तीन ते सहा महिन्यात लशीचे बरेच पर्याय उपलब्ध असतील. सध्याच्या लशी 12 महिने प्रतिकारक शक्ती देते. असं ते म्हणाले.

आरोग्य व्यवस्था मजबूत करा

राज्यातील कोरोना प्रकरणं वाढत आहेत, यामुळे आरोग्य व्यवस्थेवर ताण येऊन आरोग्य व्यवस्था कोलमडण्याची भीती व्यक्त केली जाते आहे. पण आरोग्य व्यवस्था आधीपेक्षा अधिक मजबूत करण्यात आली आहे, असंही त्यांनी सांगितलं.

सोमवारी राज्यात 47,288 नव्या रुग्णांची नोंद

रविवारी सर्वाधिक 57,074 नव्या कोरोना रुग्णांनंतर  सोमवारी राज्यात 47,288 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली, तर 155 रुग्णांचा मृत्यू झाला. त्यानंतर राज्यातील एकूण रुग्णांची संख्या 30,57,885 वर पोचली आहे. तर  56,033 एकूण बळी गेले आहेत.

सध्या राज्यात एकूण 4,51,375 ऑक्टिव्ह केसेस असून उपचार सुरू आहेत. दिवसभऱात 26,252 रुग्णांना डिस्चार्ज दिला आहे. एकूण बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या 25,49,075 झाली आहे.

Corona months under control if the rules are strictly followed; Confidence of Covid 19 Task Force members

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार झाली लाँच : टाटा टियागो EV अवघ्या 8.49 लाखांपासून; एका चार्जवर 315 किमी वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती