कोरोनाविरुध्द लढण्यासाठी लॉकडाऊनशिवाय दुसऱ्या उपाययोजनाच करायच्या नाहीत अशी सवय लागलेल्या ठाकरे सरकारने औरंगाबाद जिल्ह्यात बुधवारपासून लॉकडाऊन जाहीर केला होता. मात्र, सगळीकडून थपडा बसल्यावर लॉकडाऊनचा निर्णय रद्द केला आहे. No lockdown in Aurangabad
वृत्तसंस्था
मुंबई : कोरोनाविरुध्द लढण्यासाठी लॉकडाऊनशिवाय दुसऱ्या उपाययोजनाच करायच्या नाहीत अशी सवय लागलेल्या ठाकरे सरकारने औरंगाबाद जिल्ह्यात बुधवारपासून लॉकडाऊन जाहीर केला होता. मात्र, सगळीकडून थपडा बसल्यावर लॉकडाऊनचा निर्णय रद्द केला आहे.
औरंगाबादमध्ये कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने लॉकडाऊन करण्याचा निर्णय जाहीर झाला होता. भारतीय जनता पक्षाने राज्यात लॉकडाऊन लावण्यास विरोध केला होता. लॉकडाऊन लावल्यास गोरगरीबांच्या रोजगाराचा प्रश्न निर्माण होईल. त्यापेक्षा शासनाने इतर उपाययोजना करून कोरोना आटोक्यात आणावा अशी मागणी केली होती.
शिवसेनेचा आघातील सहकारी पक्ष असलेल्या राष्टÑवादी कॉँग्रेसनेही लॉकडाऊनला विरोध केला होता. लॉकडाऊन लावण्यापेक्षा निर्बंध कडक करावेत, अशी भूमिका मांडली होती.
औरंगाबादमधील लॉकडाऊनला एएमआयएमनेही विरोध केला होता. खासदार इम्तियाझ जलील यांनी लॉकडाऊन हा केवळ उद्योजकांच्या सोईसाठी लागू केला असल्याचा आरोप करत आंदोलनाचा इशारा दिला होता. ज्येष्ठ उद्योगपती आनंद महिंद्रा यांच्यापासून ते अनेक उद्योजक-व्यापाऱ्यांनी ठाकरे सरकारच्या लॉकडाऊनला विरोध केला होता. त्यामुळे सगळीकडूनच थपडा बसल्यावर औरंगाबादचा लॉकडाऊनचा निर्णय अखेर रद्द करण्यात आला आहे.
रविवारी झालेल्या टास्क फोर्सच्या बैठकीत मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी राज्यात लॉकडाऊन लावण्याचे संकेत दिले होते. मात्र, आता राज्यातही लॉकडाऊन लागणार नाही असे स्पष्ट झाले आहे.