विशेष प्रतिनिधी
मुंबई: सध्या कौशल कुटुंब हे बॉलीवूडमधे त्यांच्या प्रेम प्रकरणांमुळे चर्चेत आहे. विकी कौशल व कतरिना कैफ यांच्यातील प्रेम प्रकरण व दोघांचा साखरपुडा झाल्याच्या बातम्या आल्या होत्या. परंतु साखरपुड्याची अफवाच असल्याचे नंतर कळाले. आता यात भर म्हणून विकीचा लहान भाऊ सनी कौशलच्या प्रेम प्रकरणाची चर्चा सुरू झाली आहे.
Are Sharvari and Sunny Kaushal dating? Who is Sharvari Wagh? Read to know
ही शर्वरी वाघ कोण आहे असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. तर ‘The forgotten Army’ मध्ये या दोघांच्या प्रमुख भूमिका होत्या. हे दोघे तेव्हापासूनच डेटिंग करत आहेत. नुकताच सनी कौशलचा शिद्दत हा सिनेमा १ ऑक्टोबरला ott वर रिलीज झाला. या सिनेमाच्या स्पेशल स्क्रिनिंगवेळी तेथे शर्वरी उपस्थित असल्यामुळे या प्रेमप्रकरणाच्या चर्चेला उधाण आले. शर्वरिने यावेळी स्क्रीनिंगला आलेल्या फोटोग्राफर्सकडून फोटो काढून घेतले होते. सनीच्या कारकीर्दीची सुरुवात २०१० मध्ये सहाय्यक दिग्दर्शक म्हणून झाली. अक्षय कुमार बरोबर केलेल्या गोल्ड या सिनेमामुळे तो प्रसिद्ध झाला. याशिवाय आर्मी वेबसिरीस फरगॉटन आर्मी ही पण गाजली. शर्वरीची या सीरिजमध्ये भूमिका होती. तेथे त्यांची भेट झाली. शर्वरी एक मॉडेल व अभिनेत्री आहे. तिचे अभिनय क्षेत्रात पदार्पण हे वेब सिरीजमधून झाले आहे.
विकी कौशलच्या सरदार उधम सिंग सिनेमाचा ट्रेलर झाला प्रदर्शित
१४ जुन १९९६ ही शर्वरीची जन्मतारीख आहे. ती मुंबईतील असून तिचे शालेय शिक्षण दादर मधील पारसी युथ असेम्ब्ली इथून झाले. रुपारेल कॉलेजमधून तिने पदवी घेतली आहे. तिचे वडील बिल्डर व आई आर्किटेक्ट आहे. शर्वरीला एक बहीण व भाऊ आहे. तिची एक विशेष ओळख म्हणजे शिवसेनेतील ज्येष्ठ नेते व महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांची ती नात आहे. शर्वरीने सोळाव्या वर्षी मॉडेलिंग करायला सुरुवात केली. तिचे अभिनयाचे शिक्षण जेल्फ गोल्डनबर्ग स्टुडिओमध्ये झाले आहे. तिने प्यार का पंचनामा २, सोनू के टीटू की स्वीटी आणि बाजीराव मस्तानी या चित्रपटांत सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केले आहे. सनी कौशल आणि शर्वरी यांनी २०२० मधे फिल्मफेअरसाठी एक फोटो शूट केले होते.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App