विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : अभिनेता अक्षय कुमारच्या ‘बच्चन पांडे’ चित्रपटाचे नवे पोस्टर रिलीज झाले आहे. १८ फेब्रुवारीला तो रिलीज होत आहे. त्याचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अॅक्शन, कॉमेडी, रोमान्स आणि नाट्य असून अक्षयकुमार हा भयानक लूकमध्ये दिसणार आहे. Akshay Kumar in the role of a gangster; The audience will see Bachchan Pandey in a horrible look in the film
‘बच्चन पांडे’ सिनेमाच्या नव्या पोस्टरमध्ये अक्षयचे रौद्र रूप दिसत आहे. अक्षय या सिनेमात एका गँगस्टरच्या भूमिकेत दिसणार आहे. अक्षयचा हा नवा लूक सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. अक्षयने सिनेमाचे पोस्टर शेअर करत लिहिले आहे,”या पात्राच्या अनेक छटा आहेत. ‘बच्चन पांडे’ तुम्हाला घाबरवायला, हसवायला आणि रडवायला तयार आहे. फक्त तुम्ही प्रेमाचा वर्षाव करा”.
‘बच्चन पांडे’ सिनेमा १८ मार्चला होळीच्या मुहूर्तावर प्रदर्शित होणार आहे. या सिनेमाचे कथानक एका गँगस्टरवर आधारित आहे. या सिनेमात कृती सेनन, जॅकलीन फर्नांडिस आणि अर्शद वारसी, पंकज त्रिपाठी आणि प्रतिक बाबरदेखील महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App