अभिनेत्री दीपिका पादुकोणला आशियातील सर्वात प्रभावशाली महिलेचा मान ; सन्मान मिळविणारी पहिली भारतीय अभिनेत्री


वृत्तसंस्था

नवी दिल्ली : अभिनेत्री दीपिका पादुकोणला आशियातील सर्वात प्रभावशाली महिलेचा मान मिळाला आहे. हा सन्मान मिळविणारी ती पहिलीच भारतीय अभिनेत्री ठरली आहे. चित्रपट आणि टेलिव्हिजनवरील सर्वात प्रभावशाली महिला म्हणून तिला गौरवण्यात आले. Actress Deepika Padukone Is Asia Most Influential Woman In Tv And Film

दीपिका पदुकोणचे नाव चित्रपटसृष्टीत लोकप्रिय अभिनेत्रींमध्ये घेतले जाते. फक्त देशात नाही तर संपूर्ण जगात तिने वेगळे स्थान निर्माण केले आहे. ‘ओम शांती ओम’ या चित्रपटातून पदार्पण करणाऱ्या दीपिकाने अभिनयाच्या जोरावर भरपूर यश मिळवले आहे. नुकताच तिला आशियातील सर्वात प्रभावशाली महिला होण्याचा सन्मान मिळाला आहे. चित्रपट आणि टेलिव्हिजनवरील सर्वात प्रभावशाली महिला म्हणून तिला गौरवण्यात आले.



दीपिकाचा चाहता वर्ग फार मोठा आहे. यामुळे सर्वाधिक चाहतावर्ग असलेल्या सेलिब्रिटींच्या यादीत ती टॉप १०० मध्ये येते. सध्या दीपिकाचे इन्स्टाग्रामवर जवळपास ५९.८ मिलियन फॉलोअर्स आहेत. तर गुगलवरही ती नेहमीच ट्रेडींगवर पाहायला मिळते. दीपिकाच्या सर्वाधिक चाहत्यावर्गामुळे तिला आशियातील सर्वात प्रभावशाली महिला म्हणून निवडले आहे.

दीपिकाची चित्रपटसृष्टीत १३ वर्ष

दीपिकाने सिनेसृष्टीत १३ वर्ष झाली आहेत. बॉलिवूडबरोबरच हॉलिवूडमध्ये तिने वेगळी छाप सोडली आहे. दीपिका ही अनेक ब्रँडच्या जाहिरातीत काम करते. बड्या ब्रॅण्डच्या जाहिरातींची ब्रँड अॅम्बेसेडर ती असून त्या मध्ये तनिष्क, ओपो, नेस्ले फ्रूट व्हिला, लॉरिअल, रिलायन्स जियो, अ‍ॅक्सिस बँक, गुवार लाइटिंग नेसकॅफे, केलॉग्स, विस्तारा एअरलाईन्स, लक्स, जिलेट, ब्रिटानिया, गोआईबीबो या कंपन्यांचा समावेश आहे.

सध्या दीपिका रणवीरसोबत ’83’ या चित्रपटामध्ये दिसणार आहे. त्यानंतर ‘पठाण’ आणि ‘फाइटर’, ‘द इंटर्न’ या चित्रपटामध्ये झळकणार आहे. दुसरीकडे, रणवीर सिंह ‘सर्कस’, ‘तख्त’, ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ सारख्या चित्रपटांमध्ये सुद्धा दिसणार आहे.

Actress Deepika Padukone Is Asia Most Influential Woman In Tv And Film

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात