विशेष प्रतिनिधी
मुंबई : ए आर रहमान यांना संगीत कलेची दैवी देणगी लाभली आहे. गेली अनेक दशके आपण त्यांच संगीत ऐकत आलो आहोत. ऑस्कर जिंकल्यानंतर ते ग्लोबल स्टार झाले आहेत. रहमान यांनी फक्त बॉलीवूडमध्ये संगीत दिले नसून हॉलिवूडमधेही त्यांचे संगीत प्रसिद्ध आहे. तर आता आपण बघुया रहमान यांचे संगीत कुठल्या हॉलीवुडपटांमधे वापरले गेले आहे.
6 times AR Rahman’s music used in Hollywood movies
१: बॉम्बे थीम इन लॉर्ड ऑफ वार :
निकोलस केज यांचा २००५ साली रिलीज झालेल्या लोर्ड ऑफ वार चित्रपटामध्ये ए आर रहमान यांची बॉम्बे थीम वापरण्यात आली होती. या फिल्मने बॉक्स ऑफिसवर ७२ मिलियन डॉलर इतका बिजनेस केला होता.
२: छय्या छय्या – इनसाईड मेन :
इन साईड मेन या चित्रपटाचे डायरेक्टर स्पाईक ली यांना छय्या छय्या हे गाणं फार आवडलं होतं. त्यांनी हे गाणं आवडल्यामुळे ते आपल्या चित्रपटात वापर करण्याचा निर्णय घेतला. चित्रपटातील एका दृश्यासाठी हे गाणं सूट होईल या दृष्टीने त्यांनी ते वापरलं होते.
३: ‘रंग दे’ – ‘The Accidental Husband’ :
२००८ साली रिलीज झालेल्या एक्सीडेंटल हसबंड या सिनेमामध्ये ए आर रहमान यांनी संगीत दिले आहे. या सिनेमातील एका दृश्यात ‘रंग दे’ हे गाणं वापरले गेला आहे. या सिनेमामध्ये उमा थर्मन या सुप्रसिद्ध अभिनेत्रीने काम केले आहे.
४: यारो यारोडी गाणे – The Accidental Husband :
२००० साली रिलीज झालेल्या अलाईपयुथे या माधवन आणि शालिनी या जोडीचा चित्रपट हिट झाला होता. हा मूळचा तमिळ चित्रपट असून याचा हिंदी मध्ये साथिया या नावाने रिमेक बनविण्यात आला. या सिनेमातील यारो यारोडी हे रहमान यांनी संगीतबद्ध केलेले गाणे एक्सीडेंटल हसबंड या चित्रपटामध्ये एका दृष्यात वापरले आहे.
५: स्वसमे साँग – The Accidental Husband :
या चित्रपटाच्या शेवटी रहमाननी स्वसमे हे आपले गाणे एंड क्रेडिट्स मध्ये वापरले आहे. या चित्रपटाच्या तीन दृश्यात रहमान यांनी संगीतबद्ध केलेली गाणी वापरण्यात आली.
६: लायन मुवी- टेक इट इजी उर्वशी साँग :
२०१६ साली रिलीज झालेल्या लायन या चित्रपटात देव पटेल, सनी पवार आणि निकोल किडमन यांच्या मुख्य भूमिका आहेत. त्याचबरोबर दीप्ती नवल, प्रियंका बॉस, तनिष्ठा चटर्जी, आणि नवाजुद्दीन सिद्दीकी यांनी या चित्रपटामध्ये भूमिका साकारल्या आहेत. त्याचप्रमाणे रहमान यांचे टेक इट इजी उर्वशी हे गाजलेले गाणे यात वापरण्यात आले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App