२ फेब्रुवारी १८८७ मध्ये कपूरथाला या राजघराण्यात अमृत कौर यांचा जन्म झाला. त्यांचा जन्म उत्तर प्रदेश मधील लखनऊ येथे झाला. अडवोकॅसी ऑफ वुमन राइट्स मधील योगदानासाठी अमृत कौर या ओळखल्या जातात. अमृत कौर या राजा ‘सर’ हर्मन सिंग अहलुवालिया यांच्या १० पुत्रांमध्ये सगळ्यात लहान होत्या.
Amrit Kaur, India’s first health minister and freedom fighting Princess
स्वतंत्र भारताच्या अमृत कौर या पहिल्या आरोग्यमंत्री होत्या. १९४७ ते १९५७ या काळात त्यांनी हे मंत्रिपद सांभाळले. या दहा वर्षांच्या कालावधीमध्ये त्यांनी भारताचा सर्वात मोठा शत्रू मलेरिया या रोगाबरोबर लढा दिला. ऑक्सफर्ड मध्ये शिक्षण पूर्ण केल्यानंतर १९१८ साली त्या भारतात परतल्या. वडिलांचे निधन झाल्यानंतर कपूरथाला पॅलेस सोडून त्या महात्मा गांधी यांच्या आश्रम मध्ये आल्या व तेथे त्यांनी गांधींच्या सेक्रेटरी म्हणून काम केले.
१९२७ साली राजकुमारी अमृत कौर यांनी ऑल इंडिया वुमेन्स कॉन्फरन्सची स्थापना केली. त्याचबरोबर त्यांनी इंडियन कौन्सिल फॉर चाइल्ड वेल्फेअरची स्थापना करून ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (AIIMS) चा पाया रचला. बालविवाह आणि देवदासी व्यवस्थेच्या त्या कट्टर विरोधी होत्या. भारतातील देवदासी प्रथा संपवण्यासाठी त्यांनी मोहीम राबवली.
आपले राजघराण्यातील सुख त्यागून स्वातंत्र्य लढ्यामध्ये त्या अगदी लवकर आणि सहजतेने उतरल्या. जालियनवाला बाग हत्याकांड झाल्यानंतर त्यांनी ब्रिटिशांविरोधात लढा देण्यात महत्त्वपूर्ण भूमिका निभावली. १९४२ मध्ये इंग्रजांकडून मिळालेले ऍडव्हायझरी बोर्ड ऑफ एज्युकेशन च्या सदस्यत्वाचे पदावरून राजीनामा देऊन त्यांनी क्विट इंडिया मुवमेंट मध्ये भाग घेतला. इंग्रजांनी त्यांना १९३० साली मिठाच्या सत्याग्रहात सहभागी झाल्याबद्दल अटकही केले होते. अमृत कौर यांनी इंडियन लेप्रोसी असोसिएशन आणि ट्यूबर्क्युलोसिस असोसिएशनच्या प्रेसिडेंट, इंटरनॅशनल रेड क्रॉस सोसायटीचे वाईस प्रेसिडेंट आणि सेंट जोन्स ॲम्बुलन्स ब्रिगेड ऑफ इंडियाचे चीफ कमिशनर ही पदे भूषवली आहेत. १९५० साली त्यांना वर्ल्ड हेल्थ असेंबलीचे प्रेसिडेंट म्हणून नियुक्त करण्यात आले आणि त्यांनी वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनचा पाया रचला.
वयाच्या ७५व्या वर्षी, १९६४ साली त्यांचा मृत्यू झाला. राजकुमारी कौर यांनी आपले आयुष्य हे देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी तसेच महिलांचे हक्क आणि जीवघेण्या रोगांविरुद्ध लढण्यासाठी अर्पित केले.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App