कॅटरिना कैफच्या घरचे मुबंईत दाखल! विकी कौशल आणि कॅटरिना च्या लग्नाच्या चर्चांना यामुळे अजून जोर चढला


विशेष प्रतिनिधी

मुबंई : अभिनेत्री कॅटरिना कैफ आणि अभिनेता विकी कौशल या दोघांच्या लग्नाच्या बातम्यांनी सध्या इंटरनेटवर धुमाकूळ घातला आहे. हे दोघे राजस्थानमधील पॅलेसमध्ये विवाहबद्ध होणार आहेत, त्याआधी मुंबईमध्ये रजिस्टर मॅरेज करणार आहेत, लग्नासाठी पाहुण्यांना सिक्युरिटी नंबर देण्यात आलेला आहे, ड्रोन कॅमेरे दिसतील तर त्यांना शूट करण्यात येणार. अशा बऱ्याच बातम्या वारंवार मिडियामध्ये येत आहेत.

Katrina Kaif’s parents are in Mumbai! This further fueled discussions between Vicky Kaushal and Katrina’s marriage

तर सध्या ही बातमी आहे की, कॅटरिना कैफची आई, तिची बहीण आणि तिचा भाऊ मुंबईमध्ये दाखल झाले आहेत. आता या सगळ्यांच्या आगमनामुळे या दोघांच्याही लग्नाचा बातम्यांना कन्फर्मेशन मिळाल्या सारखेच आहे.


कॅटरिना कैफ आणि विकी कौशल यांचे लग्न?


करण जोहरच्या कॉफी विथ करण या शो मध्ये जेव्हा करण जोहरने कॅटरिना कैफला प्रश्न विचारला होता की, कोणत्या नवोदित अभिनेत्या सोबत तिची जोडी चांगली दिसेल? तेव्हा कॅटरिना कैफने विकी कौशल हे उत्तर दिले होते. त्यानंतर विकी कौशलने एका अवॉर्ड शोमध्ये कॅटरीनाला विचारले होते की, ‘तुम किसी अच्छे से विकी कौशल को देख के शादी क्यू नही करती?’ त्यानंतर या दोघांच्या प्रेमप्रकरणाच्या चर्चा रंगल्या होत्या. एव्हाना त्या दोघांना कधीही एकत्र स्पॉट करण्यात आलेले नाहीये. पण तरी देखील बॉलीवूडमधील या हॉट कपलच्या लग्नाच्या चर्चा सध्या सर्वत्र आहेत.

Katrina Kaif’s parents are in Mumbai! This further fueled discussions between Vicky Kaushal and Katrina’s marriage

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    शिंदे – फडणवीसांची समृद्धी महामार्गावर टेस्ट ड्राईव्ह मोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो! मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण