धार्मिक पुळका दाखविणाऱ्या आयएएस अधिकाऱ्याला नोटीस


तबलिगी जमातीच्या मरकझमधून देशात मोठ्या प्रमाणात चीनी व्हायरस पसरल्याची टीका होत आहे. मात्र, तबलिगींचे कौतुक करणाऱ्या एका सनदी अधिकाऱ्याला कर्नाटक सरकारने नोटीस बजावली आहे.


वृत्तसंस्था

बेंगळुरू: तबलिगी जमातीच्या मरकझमधून देशात मोठ्या प्रमाणात चीनी व्हायरस पसरल्याची टीका होत आहे. मात्र, तबलिगींचे कौतुक करणाऱ्याला एका सनदी अधिकाऱ्याला कर्नाटक सरकारने नोटीस बजावली आहे.

मोहम्मद मोहसीन असे कर्नाटक सरकारच्या सनदी अधिकाऱ्याचे नाव असून सरकारने या अधिकाऱ्याला कारणे दाखवा नोटीस धाडली आहे. मोहम्मद मोहसीन हे कर्नाटक राज्याच्या मागासवर्गीय कल्याण विभागाचे सचिव आहेत.

कोविड-१९ च्या रुग्णाचे प्राण वाचावेत म्हणून तबलिगी जमातीच्या सदस्याने प्लाझ्मा दान केलाहोता. मोहम्मद मोहसीन यांनी २७ एप्रिल रोजी एक ट्विट केले होते. आपल्या ट्विटमध्ये मोहम्मद मोहसीन लिहितात, ‘३०० हून अधिक तबलिगी हिरो देशाची सेवा करावी या उद्देशाने नवी दिल्लीत आपला प्लाज्मा दान करीत आहेत. त्याबाबत काय? गोदी मीडिया? या हिरोंनी केलेली माणुसकीची कामे ते (गोदी मीडिया) आपल्याला दाखवणार नाही.’

सरकारने कोविड-१९ या साथीचा आजार अतिशय गंभीर असून हा मुद्दा संवेदनशील आहे. आपण केलेल्या या ट्विटला प्रसारमाध्यमांमध्ये प्रतिकूल प्रसिद्धी मिळाली आहे. याची गंभीर दखल घेतली आहे, असे कारणे दाखवा नोटीशीत म्हटले आहे. सचिव, मोहम्मद मोहसीन यांनी अखिल भारतीय सेवा (आचार) नियम १९६८ चे उल्लंघन केले असल्याचे म्हणत सरकारने त्यांच्याकडे येत्या ५ दिवसांमध्ये लेखी स्पष्टीकरण मागितले आहे.

अंतिम मुदतीपूर्वी उत्तर सादर करण्यात अपयशी ठरल्यास अखिल भारतीय सेवा (शिस्त व अपील) नियम १९६८ कारवाई करण्याचा इशाराही यात देण्यात आला आहे.

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात