कोविडच्या सर्व चाचण्या आता महाराष्ट्रात निःशुल्क


विशेष प्रतिनिधी

मुंबई : कोविड-१९ चा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाच्या अखत्यारीतील शासकीय वैद्यकीय तसेच दंत महाविद्यालयांमध्ये व रुग्णालयांमध्ये यासंदर्भातील सर्व चाचण्या आणि उपचार नि:शुल्क करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्यमंत्री अमित विलासराव देशमुख यांनी यांनी आज येथे दिली.

जागतिक आरोग्य संघटने कडून कोविड-19 प्रादुर्भावास पंडेमिक घोषित करण्यात आले आहे. राज्यात या आजाराच्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे हे विचारात घेऊन वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाच्या अखत्यारीतील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, दंत महाविद्यालय व रुग्णालयांमध्ये कोविड-19 संदर्भातील रुग्णांच्या सर्व तपासण्या व उपचार यापुढे नि:शुल्क करण्यात आले आहेत.

कोविड -१९ ग्रस्त रुग्णांना सुलभतेने उपचार घेता यावेत व यावर उपचार घेण्यासाठी अधिकाधिक रुग्णांनी पुढे यावे या दृष्टीने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. कोविड-19 ग्रस्त रुग्णावर उपचारासाठी अधिक पैसे लागतील या भीतीपोटी अनेक रुग्ण आपला आजार लपवतात.

असा अनुभव आहे. या निर्णयामुळे अधिकाधिक रुग्ण पुढे येऊन स्वतः वर उपचार करून घेतील त्याचप्रमाणे या निर्णयामुळे अधिकाधिक चाचण्या घेणे शक्य होणार असल्याने कोविड-19 ला प्रतिबंध करण्याच्या दृष्टीने हा निर्णय महत्त्वपूर्ण ठरेल, असेही वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित विलासराव देशमुख यांनी म्हटले आहे.

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात