कल्याणमध्ये कोविड संशयीत वयोवृद्धाला सरपटत यावं लागलं चौथ्या मजल्यावरुन


विशेष प्रतिनिधी

कल्याण : डोंबिवलीतील वृद्ध कोरोना रुग्णाला रुग्णवाहिका नसल्याने चौथ्या मजल्यावरुन सरपटत खाली यावे लागल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. कल्याण पूर्व येथे राहणारा हा कोरोना संशयीत वृद्ध चौथ्या मजल्यावरुन सरपटत खाली आल्यानंतरही त्याची दैना संपली नाही. त्यांना घेण्यासाठी आलेली रुग्णवाहिका त्यांना न घेताच निघून गेली. या घटनेचा व्हीडीओ व्हायरल झाला आहे.

कल्याण डोंबिवली महापालिकेचा भोंगळ कारभार यावरून उघड झाला आहे. कल्याणमधील हनुमाननगरातील दोन जणांना कोरोनाची लागण झाली आहे. ते एका चार मजली इमारतीत राहतात. त्यांना कोरोना झाल्याने त्यांच्या घरातील त्यांचे 71 वर्षीय वडील व आई या दोन कोरोना संशयित रुग्णांना रुग्णालयात घेऊन जाण्यासाठी त्यांच्या मुलांनी फोन केला.

या दोन्ही वृद्धांना घेण्यासाठी रुग्णवाहिका सोसायटीच्या दारात आली. दरम्यान या दोन्ही वयोवृद्धांना चालण्याचा त्रस असल्याने ते दोघेही चौथ्या मजल्यावरुन सरपटत खाली आहे. ते खाली आल्यावर त्यांना घेण्यासाठी आलेली रुग्णवाहिका निघून गेली होती.

रुग्णवाहिकेच्या चालकने थांबण्यास नकार दिला. या घटनेचा व्हीडीओ व्हायरल झाला आहे. घटनेचे कथन त्यांच्या मुलांनी व्हीडीओत केले आहे. महापालिकेकडे 33 रुग्णवाहिका आहे. त्यापैकी काही रुग्णवाहिका महापालिकेच्या आहे. बहुतांशी रुग्णवाहिका भाडे तत्वावर घेण्यात आल्या आहेत. रुग्णवाहिका चालकाना तीन शिफ्टमध्ये काम करावे लागते. त्यांच्या चाचण्या करण्यात आलेल्या नाहीत. खाजगी रुग्णवाहिकांवर महापालिकेचे नियंत्रण नाही. त्याचा फटका या वयोवृद्धांना बसला आहे.

यासंदर्भात महापालिका प्रशासनाने सांगितले की, त्या दोन कोरोना संशयित वृद्धाना घेण्यासाठी रुग्णवाहिका गेली होती. मात्र रुग्णवाहिका चालकाचा उपवास होता. उपवास सोडण्याची वेळ सायंकाळी सात वाजता होती. रुग्णवाहिका चालक उपवास सोडण्यास गेल्याने वृद्धांची गैरसोय झाल्याचे महापालिकेने मान्य केले.

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात