पुण्यात कोरोना बाधीतांची संख्या एकाच दिवसात 11 ने वाढली; पुणे विभागातले कोरोना पाॅझिटिव्ह 101


विशेष प्रतिनिधी

पुणे : पुण्यात शुक्रवारी (दि. 3) एकाच दिवशी कोरोना बाधीतांची संख्या 11 ने वाढली. पुण्यासह विभागातील अन्य सांगली, सातारा, सोलापूर आणि कोल्हापूर जिल्ह्यातही कोरोना विषाणूचे रूग्ण झपाट्याने वाढत आहे.

पुणे विभागात एकाच दिवसात कोरोना ‘पॉझिटीव्ह’ रूग्णांची संख्येत मोठी वाढ झाली असून ती 101 वर पोहचली आहे. ते पुणे 71, सातारा 3, सांगली 25 आणि कोल्हापूर 2 असे असल्याची माहिती विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी दिली.

डॉ. म्हैसेकर म्हणाले की, तपासणीसाठी पाठविलेले एकूण नमुने 2018 होते. त्यापैकी 1878 नमुन्यांचे अहवाल प्राप्त झालेले असून 140 चे अहवाल प्रतिक्षेत आहे. प्राप्त अहवालापैकी 1 हजार 777 नमुने निगेटीव्ह आहेत व 101 नमुने पॉझिटीव्ह आहेत. आतापर्यंत 18 रुग्णांना बरे झाल्यामूळे रुग्णालयामधून सोडण्यात आलेले आहे.

विभागामधील 8 हजार 178 प्रवाशापैकी 3 हजार 996 प्रवाशांबाबत फ़ॉलोअप सुरू असून 4 हजार 282 प्रवाशांबाबत पूर्ण झालेला आहे, आजपर्यंत 15 लाख 61 हजार 992 घरांचे सर्वेक्षण पूर्ण करण्यात आले असून त्याअंतर्गत 72 लाख 87 हजार 291 व्यक्तींची तपासणी करण्यात आली आहे. त्यापैकी 490 व्यक्तींना अधीक तपासणीसाठी संदर्भीत करण्यात आले आहे.

रुग्णालयांबाबत बोलतांना ते म्हणाले, पुणे विभागात एकूण 88 ठिकाणी क्वारंटाइन सुविधा निर्माण करण्यात आली असून या ठिकाणी एकूण 12 हजार 848 बेडस उपलब्ध आहेत तसेच 52 ठिकाणी आयसोलेशन सुविधा निर्माण करण्यात आली असून या ठिकाणी एकूण 2 हजार 167 बेडस उपलब्ध आहेत, त्याप्रमाणे विभागात शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थांचे रुग्णालयांकडे सद्यस्थितीत एकूण एन-95 मास्क 49 हजार 845 ट्रिपल लेअर मास्क 4 लाख 69 हजार 194 एवढे उपलब्ध आहेत. तसेच 3 हजार 781 पीपीई किट तसेच 12 हजार 944 सॅनीटायझर उपलब्ध असल्याचे त्यांनी सांगितले.

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात