शेतकरी आंदोलनातील हेट स्पिचनंतर योगराज सिंग यांची काश्मीर फाईल्स सिनेमातून हकालपट्टी

  • युवराज सिंगही योगराज सिंग यांच्या हेट स्पिचशी असहमत; शेतकरी आंदोनलावर चर्चेतून तोडगा काढण्याला पाठिंबा

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : शेतकरी आंदोलनातील हेट स्पिचमुळे सोशल मीडियावर ट्रोल होत असलेल्या क्रिकेटपटू योगराज सिंग यांना आणखी एक नुकसान सोसावे लागत आहे. प्रख्यात दिग्दर्शक विवेक अग्निहोत्रीने योगराज सिंग यांची काश्मीर फाईल्स या त्यांच्या महत्त्वाकांक्षी चित्रपटातून डच्चू दिला आहे. yograj singh latest news

भारताचा विक्रामवीर क्रिकेटपटू युवराज सिंग यानेही ट्विटमधून शेतकरी आंदोलनावर भाष्य करताना आपले वडील आणि प्रसिद्ध वेगवान गोलंदाज योगराज सिंग यांनी शेतकरी आंदोलनात दिलेल्या हेट स्पीचपासून अंतर देखील राखले आहे. किंबहुना योगराज सिंग यांनी दिलेल्या हेट स्पीचशी आपण सहमत नसल्याचे युवराज सिंगने स्पष्ट केले आहे. yograj singh latest news

yograj singh latest news

तर विवेक अग्निहोत्रीने काश्मीर फाइल्स या सिनेमातून त्यांना काढून टाकले आहे. एका महत्त्वाच्या रोलसाठी विवेकने योगराज सिंग यांना साइन केले होते. परंतु, योगराज सिंग यांनी शेतकरी आंदोलनातील भाषणात हिंदू समाज आणि महिलांविषयी अत्यंत आक्षेपार्ह भाषा वापरली होती. हिंदूंनी मुघलांना आपल्या महिला दिल्या वगैरे बेछूट विधाने त्यांनी केली होती. या विधानांशी सहमत नसल्याचे स्पष्ट करून विवेकने सिनेमातून योगराज सिंग यांना काढून टाकले.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*