दगडफेकूंना आणि कोरोनाफैलावूंना सलमानचे खडे बोल…!

या संकटकाळात संपूर्ण हिंदूस्थान एकवटला आहे. पण तुमच्या सारख्या मूठभर लोकांमुळे कोरोना फैलावतोय. डॉक्टर, नर्स, पोलिस काम करताहेत म्हणून आपण घरी सुरक्षित आहोत. ते नसते तर साऱ्या हिंदूस्थानभर चीनी व्हायरसचा फैलाव व्हायला आणि आपण बळी पडायला वेळ लागला नसता, याची आठवणही सलमानने करून दिली आहे.


विशेष प्रतिनिधी

मुंबई : कोरोनावरील उपचार करण्याऱ्या डॉक्टर, नर्स, पोलिसांवर दगडफेक करणाऱ्या आणि कोरोना फैलावाणाऱ्या जमातीला अभिनेता सलमान खानने खडे बोल सुनावले आहेत.
लॉकडाऊनच्या काळात सलमान पनवेलच्या फार्म हाऊसवर राहतो आहे. तेथून त्याने विडिओ तयार करून दगडफेकू आणि कोरोनाफैलावू जमातीला खडे बोल सुनावले.
लोकशाही, अविष्कार स्वातंत्र्याच्या नावाखाली शाहीनबागी आंदोलनाला आणि शहरी नक्षलवाद्यांना पाठिंबा देणारी award वापसी गँग आणि त्यांचे तथाकथित म्होरके आपले शहामृगी तोंड वाळूत खूपसून बसले आहेत. त्यांना कोरोना फैलावणारी तबलिगी जमात दिसत नाही की इंदूर, मुरादाबादमधली दगडफेकू गँग दिसत नाही. त्यांच्या या मस्तवालपणावर चकार शब्द बोलायला बुद्धिवादी गँग तयार नाही. या पार्श्वभूमीवर सलमानने खडे बोल सुनावण्याला महत्त्व आहे.

डॉक्टर, नर्स, पोलिसांवर दगडफेक करून तुम्ही जाणार कोठे? का स्वत:हून यमराजाला निमंत्रण देताय? हॉस्पिटलमधून पळून जाऊन तुम्ही जीवनाकडे चाललाय का मृत्यूच्या दिशेने वाटचाल करताय, याचे तरी भान ठेवा, असे सलमानने म्हटले आहे.
डॉक्टर, नर्स, पोलिस काम करताहेत म्हणून आपण घरी सुरक्षित आहोत. ते नसते तर साऱ्या हिंदूस्थानभर चीनी व्हायरसचा फैलाव व्हायला आणि आपण बळी पडायला वेळ लागला नसता, याची आठवणही सलमानने करून दिली आहे. कोरोना फैलावून तुम्ही रामनाम सत्य आहे आणि ला इलाहा इल्लीला म्हणत तुमच्या मित्रांचे आणि नातेवाईकांचे फक्त मृतदेहच उचलत बसणार काय?, असा संतप्त सवालही त्याने केला.
या संकटकाळात संपूर्ण हिंदूस्थान एकवटला आहे. पण तुमच्या सारख्या मूठभर लोकांमुळे कोरोना फैलावतोय. हिंदूस्थान कोरोनाशी मुकाबला करतोय. तुम्हीही त्या लढाईत सामील व्हा, असे आवाहन त्याने केले.

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात