लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधींच्या घरी झालेल्या मतचोरीच्या प्रेझेंटेशनच्या वेळी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे पक्षप्रमुख शरद पवार यांना शेवटच्या रांगेत बसवल्याची बातमी महाराष्ट्रभर गाजली.
मतदान चोरी प्रकरणावरून निवडणूक आयोगाला टार्गेट करायचा बहाणा आहे; INDI आघाडीवर नेतृत्व लादायचा खरा निशाणा आहे!!, असेच राहुल गांधींच्या आत्तापर्यंतच्या राजकीय खेळींवरून स्पष्ट होते. राहुल गांधींनी ज्या प्रकारे मतदान चोरीचा विषय लावून धरला आणि त्यांच्या पाठोपाठ सगळ्या प्रादेशिक नेतृत्वाची फरफट केली, ते पाहता वर उल्लेख केलेलाच मुद्दा खरा आहे.
बेरजेचे राजकारण करताना वजाबाकी नाही झाली म्हणजे मिळवली!! किंबहुना ओबीसींना जवळ करताना हाती असलेल्या मराठ्यांना गमावले नाही म्हणजे मिळवले!!, असे म्हणायचे वेळ शरद पवार यांच्या मंडल यात्रेने आणली.
भारतावर जादा टेरिफ लादून दादागिरी करणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी आज जोरदार टोला हाणला. सब के बॉस तो हम है!!, असे समजणाऱ्यांना भारताचा विकास सहन होत नाही, पण भारत वेगाने प्रगती केल्याशिवाय राहणार नाही. जागतिक आर्थिक महासत्ता बनल्याशिवाय थांबणार नाही, अशा शब्दांमध्ये राजनाथ सिंह यांनी ट्रम्प तात्यांना सुनावले.
श्रीमंत मराठ्यांना ओबीसी समाजाने विरोध करू नये, यासाठी शरद पवारांनी मंडल यात्रा काढली, अशा शब्दांमध्ये वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी पवारांच्या जातीय राजकारणाची पोलखोल केली.
महिला आणि मराठा राजकारण करून थकले; ओबीसी राजकारणाच्या आश्रयाला पोहोचले!!, हेच आजपासून सुरू झालेल्या शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंडल यात्रेचे वर्णन करावे लागेल.
राष्ट्रवादी काँग्रेसचे (शप) अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी आजच्या नागपूर मधल्या पत्रकार परिषदेत दोन माणसे भेटल्याची स्टोरी सांगितली. पण त्यामुळे पवारांच्या पुड्या सोडण्याच्या जुन्या सवयीची आठवण झाली.
शरद पवार आणि राहुल गांधींना 160 जागांची गॅरंटी दिली कुणी??; दोन माणसे भेटल्याची पवारांनी सोडली नवी पुडी??, असा सवाल शरद पवारांच्या आजच्या नागपूर मधल्या पत्रकार परिषदेमुळे समोर आला.
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दररोज संजय राऊत यांच्यासारखी बडबड करून आंतरराष्ट्रीय संबंधांमधल्या गंभीर चर्चेची चव घालवली असली
राहुल गांधींना कर्नाटकातल्या महादेवपुरा मतदारसंघातली दिसली मतदार यादीची “चोरी”; पण मालेगावातली नाही दिसली शिरजोरी!!, हे सत्य राहुल गांधींच्या पत्रकार परिषदेनंतर उघड झाले.
राहुल गांधींना कर्नाटकातल्या महादेवपुरा मतदारसंघातली दिसली मतदार यादीची “चोरी”; पण मालेगावातली नाही दिसली शिरजोरी!
राहुल गांधींना महादेवपुरा मतदारसंघातली दिसली “चोरी”; पण मालेगावातली नाही दिसली शिरजोरी!!, असेच राहुल गांधींच्या पत्रकार परिषदेनंतर उघड झाले.
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर संतापून 50 % टेरिफ लादला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ट्रम्प यांचे नाव न घेता भारतीय शेतकऱ्यांचे हित जपणारच, असे सांगून परखड प्रत्युत्तर दिले म्हणून अमेरिकेशी सगळे संबंध संपले
भारताने ऑपरेशन सिंदूर मध्ये पाकिस्तानातल्या नूर खान हवाई तळावर आणि किराणा हिल्स वर केलेल्या हल्ल्याची खुन्नस अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी काढली.
एकीकडे उबाठा सेनेच्या भास्कर जाधव यांना मंत्रीपदाची घाई झाली, तर दुसरीकडे महाविकास आघाडी बिघाडीची शशिकांत शिंदे यांनी कबुली दिली. त्यामुळे महायुतीतल्या एकाही मंत्र्याची विकेट काढू शकलो नाही, असे शशिकांत शिंदेंना म्हणावे लागेल.
भारत रशियाकडून तेल खरेदी करतो म्हणून अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर 50% टेरिफ लादायची हिमाकत केली. चीनवर दादागिरी करता येत नाही म्हणून त्यांनी भारतावर दादागिरी करून पाहिली.
कुठेही कुठलेही आंदोलन दिसले, की रोहित पवार त्यात घुसलेच!!, असे चित्र आज पुन्हा एकदा समोर आले. मुंबईत दादर मधल्या कबूतर खान्यासाठी जैन समाजाने कबूतर खान्यापाशी आंदोलन केले. जैन समाज आणि पोलीस प्रशासन समोरासमोर आले.
वनतारातली माधुरी हत्तीण आणि कबुतरांचे दाणे हे विषय मराठी माध्यमांनी आणि विरोधी पक्षांनी अशा पद्धतीने लावून धरले की जणू काही महाराष्ट्रातले सगळे प्रश्नच सुटून गेलेत!!
फडणवीस सरकार मध्ये राहून पवार संस्कारितांच्या गेमा; भाजपच्या मंत्र्यांना बदनाम करा!!, असला प्रकार फडणवीस सरकार मधल्या राज्यमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर यांनी समोर आणला. प्रधानमंत्री आवास योजनेतील घरे विधवा महिलांना देण्यात अडथळा आणणाऱ्या ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा मेघना बोर्डीकर यांनी वापरली होती. पण त्या कार्यक्रमाचा अर्धवट व्हिडिओ अजित पवारांच्या नेत्याने आमदार रोहित पवारांना दिला, असा धक्कादायक खुलासा मेघना बोर्डीकर यांनी केला. बोर्डीकरांनी पवार संस्कारितांना expose केले.
लोकसभेतले विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांनी बिहार मधल्या मतदार यादीच्या मुद्द्यावर संपूर्ण देशभर गाजावाजा केला निवडणूक आयोगापासून ते भाजप पर्यंत सगळ्यांना ठोकून काढले. पण राहुल गांधी नेमके काय आहेत??, याची पोल प्रशांत किशोर यांनी खोलली.
लांडगा आला रे आला म्हणून एकनाथ शिंदेंच्या हातून शिवसेना घेताहेत काढून हेच सत्य वकील असीम सरोदे यांच्या वक्तव्यातून समोर आले. पुढच्या महिन्यात शिवसेनेचा निकाल सुप्रीम कोर्टात लागतोय एकनाथ शिंदे यांच्या हातातून शिवसेना निसटते आहे त्यांना शिवसेना पक्ष आणि चिन्ह मिळणार नाही, असा दावा असीम सरोदे यांनी केला.
मालेगाव बॉम्बस्फोटातले सगळे आरोपी निर्दोष सुटले. सोनिया गांधी प्रणित काँग्रेसचा हिंदू दहशतवादाचा narrative उद्ध्वस्त झाला. याबद्दलचा संताप काँग्रेस पेक्षा शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जास्त उमटला. त्यामुळे तामिळनाडूचे वारे महाराष्ट्रात आणले आणि पवार बुद्धीचे शिलेदार सनातन हिंदू धर्माला शिव्या देऊ लागले, असे महाराष्ट्रात घडून आले.
मुंबईत ठाकरे बंधूंना स्ट्राईक, पुण्यात दादागिरीचा बाऊन्सर; फडणवीसांच्या खेळीने काँग्रेस + पवार क्लीन बोल्ड!!, असे महाराष्ट्राच्या राजकारणातले चित्र निर्माण झालेय.
महाराष्ट्रात राजकीय फेरमांडणी व्हावी आणि आपापल्या पक्षांचे पुनरुज्जीवन व्हावे यासाठी दोन मोठ्या राजकीय हालचाली आज घडल्या. राजकीय पुनरुज्जीवनासाठी शेतकरी कामगार पक्ष ठाकरे बंधूंच्या दारी गेला, तर संभाजी ब्रिगेडचे नेते प्रवीण गायकवाड शरद पवारांना घरी जाऊन भेटून आले. दोन्ही ठिकाणी राजकीय अस्तित्वाची लढाई असल्याने शेकाप आणि संभाजी ब्रिगेड या संघटनांनी दोन राजकीय घराण्यांचा आश्रय घेतला.
श्यामची आई 71 वर्षानंतरही दिल्लीत सुपरहिट राष्ट्रीय पुरस्कारांच्या यादीत पुन्हा फिट!!, असे आज घडले. साने गुरुजींच्या श्यामच्या आईने 71 वर्षांपूर्वी 1954 मध्ये राष्ट्रपतींचे सुवर्ण कमळ पटकावले होते
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App