मी जरांगे पाटलांच्या विरोधात बोलले नाही. लोकसभा निवडणुकीतील माझ्या भाषणाचा विपर्यास केला गेला, असे विधान मंत्री पंकजा मुंडे यांनी केले आहे. त्या म्हणाल्या, मी जरांगे यांना देखील सांगू इच्छिते. आपल्या समाजामधील दरी मिटवूयात. जे गोपीनाथ मुंडेंचे व्यक्तिमत्व आहे तेच माझे व्यक्तिमत्त्व आहे, असेही मुंडे म्हणाल्या. परळी येथे आयोजित दीपावली स्नेह मिलन कार्यक्रमात त्या बोलत होत्या.
पुण्यातील जैन बोर्डिंग भूखंडाच्या व्यवहारावरून शिवसेना शिंदे गटाचे नेते रवींद्र धंगेकर आणि केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यात कलगीतुरा रंगला आहे. या प्रकरणावरून धंगेकर चांगलेच आक्रमक झाले असून, त्यांनी मुरलीधर मोहोळ यांच्यावर गंभीर आरोप केलेत. आता या वादात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठे विधान केले आहे. धंगेकर हे अन्यायाविरोधात लढणारे कार्यकर्ते असून, त्यांना “महायुतीमध्ये दंगा करायचा नाही,” असा सल्ला दिल्याचे एकनाथ शिंदे यांनी सांगितले.
राज्याचे मंत्री संजय शिरसाट यांनी नुकताच राजकीय निवृत्तीचा सूर लावल्यामुळे राजकीय वर्तुळात एकच चर्चा सुरू झाली आहे. शिरसाट यांच्या या वक्तव्याचा आमदार रोहित पवार यांनी खरपूस समाचार घेतला आहे. त्यांनी थेट सिडको जमीन घोटाळ्याचा संदर्भ देत शिरसाट यांना जबरदस्त टोला लगावला. सिडकोत मलिदा खाताना कुठेतरी थांबावे असा विचार का आला नाही? आता मंत्रिपदावरून गच्छंतीची वेळ येताच राजकीय निवृत्तीचे वेध लागले. आता वय पुढे करून पळ काढू नका, असे रोहित पवार म्हणालेत.
बॉलीवूडची खानावळ नाही राहिली “उपयोगी”; म्हणून पाकिस्तानने वाढवली “दहशतवाद्यांची” यादी!!,
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यांनी आज एकाच दिवशी सातारा जिल्ह्यात जाऊन वेगवेगळी राजकीय पेरणी केली.
राज्यातील विरोधकांनी आता निवडणूक आयोगाविरोधात रस्त्यावर उतरून लढा देण्याचा निर्णय घेतला आहे. मतदार यादीतील अनियमितता, बनावट मतदार आणि आयोगाच्या निष्क्रियतेविरोधात महाविकास आघाडी आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांनी 1 नोव्हेंबर रोजी मुंबईत विराट मोर्चाचे आयोजन केले आहे. या मोर्चाला महाराष्ट्रातील सर्व प्रमुख विरोधी पक्षांचा पाठिंबा मिळत असून, यामुळे राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ माजली आहे. या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शिवतीर्थ निवासस्थानी पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची तातडीची बैठक बोलावली होती.
सातारा जिल्ह्यातील फलटण उपजिल्हा रुग्णालयातील एका महिला डॉक्टरच्या आत्महत्येमुळे राज्यभरात संतापाची लाट उसळली आहे. तर विरोधकांकडून सत्ताधारी पक्षावर आरोप केले जात आहेत. या प्रकरणावर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली असून, तरूण महिला डॉक्टरचा मृत्यू अत्यंत दुर्दैवी आहे. यामध्ये जे कोणी सहभागी असतील, त्यांना कठोरता कोठोर शिक्षा दिली जाईल, असे ते म्हणाले. याबरोबरच त्यांनी अशा संवेदनशील विषयाचे राजकारण करणे अत्यंत असंवेदनशील असल्याचेही म्हणत विरोधकांवर निशाणा साधला.
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण हे काँग्रेस सोडून भाजप मध्ये आले असले आणि अजित पवार त्याच भाजपच्या सत्तेच्या वळचणीला आले असले तरी पवार आपले चव्हाण घराण्याशी असलेले राजकीय वैर विसलेले नाहीत.
जमिनीच्या मालकी हक्काच्या वादातील महसूल दप्तरी नोंद करण्यासाठी एका अज्ञात व्यक्तीने थेट राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या बनावट सही आणि शिक्क्यांचा वापर केल्याचा धक्कादायक प्रकार डोंबिवलीत उघडकीस आला. मंत्रालयातील महसूल विभागाच्या एका विशेष कार्य अधिकाऱ्याचेही बनावट पत्र वापरून हा आदेश काढण्यात आला होता. तक्रारदाराच्या सतर्कतेमुळे हा गैरप्रकार समोर आला असून या प्रकरणी विष्णुनगर पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करून कसून तपास सुरू केला आहे.
दिवाळीच्या सुट्ट्या आणि शनिवार-रविवारची जोड मिळाल्याने मागील चार दिवसांपासून शिर्डीत देशभरातून आलेल्या साईभक्तांची मोठी गर्दी झाली. साईनगरीच्या संपूर्ण परिसरातील वाहनतळ, पार्किंग, भक्तनिवास आणि साईमंदिर दर्शनरांग सर्वत्र हाऊसफुल्ल आहे.
पुण्यामध्ये महायुती मधले संबंध पुरते खारट झाल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रवींद्र धंगेकरांना निरोप पाठविला, महायुती मिठाचा खडा पडता कामा नये!! पण तोपर्यंत धंगेकरांना महायुतीत काय करायचे होते, ते करून झाले होते.
दीपावलीच्या मंगल संध्याकाळी रामतीर्थ गोदावरी सेवा समितीच्या वतीने आयोजित भव्य ‘गोदावरी महाआरती’ सध्या अत्यंत भक्तिभावाने पार पडत आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्या प्रमुख उपस्थितीत आज राजभवन, मुंबई येथे ‘प्राकृतिक कृषी संमेलन 2025’ झाले.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले की, नैसर्गिक शेती ही केवळ शेतीची पद्धत नसून ती शाश्वत शेतीकडे नेणारी एक सर्वसमावेशक दृष्टी आहे. रासायनिक खतांसह बियाणांचा अतिवापर जमिनीची सुपीकता कमी करत आहे, त्यामुळे उत्पादन खर्च वाढत असून शेतकऱ्यांवर संकट येत आहे. अशा स्थितीत नैसर्गिक शेती ही निसर्गाशी सुसंगत आणि नफा वाढवणारी दिशा ठरते. निसर्गाने दिलेल्या प्रत्येक घटकाचा उपयोग करून शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च कमी करता येतो आणि पर्यावरणाचा समतोल राखत शाश्वत विकास साधता येतो.
राज्यात वाढत असलेल्या बेकायदेशीर बांगलादेशी स्थलांतरितांवर नियंत्रण मिळवण्यासाठी फडणवीस सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्र सरकारने सर्व जिल्हाधिकाऱ्यांसह संबंधित विभागांना बेकायदेशीर बांगलादेशी नागरिकांची ब्लॅकलिस्ट तयार करण्याचे आणि शिधापत्रिकांची पडताळणी करण्याचे आदेश दिले आहेत. याशिवाय, राज्य शासनाने नवीन शिधापत्रिकेसाठी सुधारित मार्गदर्शक सूचना देखील जारी केल्या आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेस मधून भाजपमध्ये आलेल्या आणि आमदार झालेल्या समाधान आवताडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मराठा आंदोलन मनोज जरांगे यांना एकत्र आणायचा घाट घातलाय.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘सोलर डिफेन्स अँड एअरोस्पेस लिमिटेड कंपनीला संरक्षण आणि एअरोस्पेस उपकरणांच्या निर्मितीसाठी मिहान एसईझेड, नागपूर येथील सुमारे 223 एकर भूखंडाचे वाटपपत्र अटींच्या अधीन राहून प्रदान केले.
सतत नकारात्मक बातम्या येणाऱ्या बीडमधून सकारात्मक बातमी आली. ‘दिवाळी नवीन घरकुलात’ या उपक्रमांतर्गत बीड जिल्ह्यानं राज्यात विक्रमी कामगिरी केली
आम्ही महायुतीत राहूनच निवडणूक लढवणार आहोत. पण, स्थानिक पातळीवर कोणी जास्त खुमी दाखवली तर धनुष्यबाण कसा चालतो ते दाखवू, असा इशारा शिवसेना शिंदे गटाचे नेते व मंत्री उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेत बोलताना दिला आहे
मराठा आरक्षणासाठी राज्यात रान पेटवणारे मनोज जरांगे पाटील आता शेतकऱ्यांच्या मदतीसाठी मैदानात उतरले आहेत. अतिवृष्टीमुळे राज्यातील 29 जिल्ह्यांमध्ये झालेल्या मोठ्या नुकसानीनंतरही शेतकऱ्यांपर्यंत मदत पोहोचली नसल्याने, जरांगे पाटलांनी थेट भाऊबीजेच्या मुहूर्तावर शेतकऱ्यांसाठी आंदोलन उभारण्याचा इशारा सरकारला दिला आहे.
भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी भारतात लोकपाल व्यवस्था लागू करण्यात आली. पण आता लोकपाल अध्यक्ष व त्यांच्या 7 सदस्यांना आलिशान व महागड्या बीएमडब्ल्यू गाड्या घेऊन देण्यात येणार आहेत. लोकपालसाठी ऐतिहासिकस लढा देणाऱ्या ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी या प्रकारावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. आपण भ्रष्टाचार होऊ नये अशी अपेक्षा करतो आणि त्यानंतर भ्रष्टाचार होण्यासाठी कारवाई होत असेल तर ती दुर्दैवी गोष्ट आहे, असे ते म्हणालेत.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही राष्ट्रभक्ती, समाजसेवा आणि राष्ट्र निर्माणासाठी कार्य करणारी देशातील प्रमुख संस्था आहे.
हिंदी सक्ती’ आणि ‘त्रिभाषा सूत्र’ हे दोन्ही शासन निर्णय रद्द झाल्यानंतर झालेल्या विजयी मेळाव्यात तब्बल 20 वर्षांनंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे आणि शिवसेना (ठाकरे गट) प्रमुख उद्धव ठाकरे हे एकाच मंचावर दिसले होते. या ऐतिहासिक क्षणानंतर दोन्ही ठाकरे बंधूंच्या भेटीगाठींना अक्षरशः वेग आला आहे.
अतिवृष्टी आणि पुरामुळे मराठवाड्यासह अनेक जिल्ह्यांतील शेतकरी बांधवांच्या संसारावर संकट कोसळलं आहे. पण त्यांचा आत्मविश्वास अजूनही ठाम आहे. राज्यातल्या फडणवीस सरकारने त्या शेतकऱ्यांसाठी मोठे पॅकेज देखील जाहीर केले आहे. पण त्याचवेळी भाजपचे भोसरीचे आमदार महेश लांडगे एका अनोख्या संकल्पासह मदतीसाठी पुढे आले आहेत. आपत्तीग्रस्त शेतकरी बांधवांना ते 100 गाई देणार आहेत.
प्रहार संघटनेचे नेते तथा माजी आमदार बच्चू कडू हे शिवसेनेतील बंडावेळी केवळ पैशांसाठीच गुवाहाटीला गेले होते, असा दावा माजी खासदार नवनीत राणा यांचे पती तथा आमदार रवी राणा यांनी केला आहे. बच्चू कडूंनी आतापर्यंत जी आंदोलने केली, ती केवळ पैशांसाठीच केली. विधानसभेला उमेदवार उभे करून पैसे उकळणे हेच त्यांचे काम आहे. हा एक नंबर चिल्लर माणूस असून, त्या चिल्लर माणसाने जास्त वाजू नये, असे त्यांनी म्हटले आहे. रवी राणा यांच्या या टीकेमुळे अमरावतीचे राजकारण चांगलेच तापले आहे.
आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षात मोठ्या हालचाली सुरू झाल्या आहेत. युतीबाबतचे तर्क-वितर्क सुरू असतानाच काँग्रेसचे ज्येठ नेते आणि माजी मुंबई काँग्रेस अध्यक्ष भाई जगताप यांनी स्पष्टपणे जाहीर केले आहे की, काँग्रेस पक्ष ठाकरे बंधूंसोबत, म्हणजेच उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे, या दोघांच्या पक्षांसोबत युती करणार नाही. मी मुंबई काँग्रेसचा अध्यक्ष असताना हीच भूमिका स्पष्ट केली होती आणि आजही त्यात बदल नाही, असे ठामपणे सांगत जगताप यांनी पक्षातील कार्यकर्त्यांचा आवाज मांडला आहे. त्यामुळे महानगरपालिकेच्या रणांगणात काँग्रेस स्वतंत्रपणे उतरू शकते, अशी शक्यता अधिक बळावली आहे.
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App