• Download App
    Maharashtra Latest News - Breaking news | Focus India

    आपला महाराष्ट्र

    Rohit Pawar : हा भोंदू महाराष्ट्रात दिसता कामा नये; आमदार रोहित पवार संतापले- ‘भोंदू बागेश्वर’ म्हणत बंदीची मागणी

    राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी धीरेंद्र शास्त्री उर्फ बागेश्वर बाबा यांचा उल्लेख ‘भोंदू’ असा करत त्यांच्यावर महाराष्ट्रात बंदी घालण्याची मागणी केली आहे. शिवराय थकले व राजपाट समर्थांकडे दिला हे भोंदू बागेश्वर यांचे विधान अत्यंत संतापजनक आहे. ते पुन्हा महाराष्ट्रात दिसता कामा नये. त्यांच्यावर राज्यात बंदी घातली पाहिजे, असे ते आपला संतप्त सूर आळवत म्हणालेत.

    Read more

    Fadnavis : बागेश्वर बाबांच्या विधानावर देवेंद्र फडणवीसांची स्पष्ट भूमिका; उद्धव ठाकरेंच्या भेटीचे वृत्तही फेटाळले, म्हणाले- लपून भेटण्याची गरज नाही

    नागपूरमध्ये पार पडलेल्या एका धार्मिक कार्यक्रमानंतर बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनी केलेल्या वक्तव्यामुळे राज्यात नव्या वादाला तोंड फुटले आहे. या वक्तव्यात त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि समर्थ रामदास स्वामी यांच्याशी संबंधित एक प्रसंग सांगितला. या कथनामुळे राजकीय आणि सामाजिक स्तरावर तीव्र प्रतिक्रिया उमटू लागल्या असून, यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पहिल्यांदाच आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

    Read more

    फडणवीस – ठाकरे भेटीची सोडली पुडी; पण संशय पेरणी दोघांपैकी कुणाविषयी??

    नाशिक : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या भेटीची पुडी एका सोशल मीडिया अकाउंटने सोडली. पण त्यामधून संशय पेरणी दोघांपैकी कुणाविषयी झाली??, […]

    Read more

    Sunetra Pawar : सुनेत्रा पवारांचा मोठा निर्णय:राष्ट्रवादीत ‘थ्री लेअर’ सूत्रांची अंमलबजावणी; पार्थ-जय पवारांवर नवी जबाबदारी, नेतृत्वाचे वाटप

    राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठा संघटनात्मक बदल करण्यात आला असून, पक्षाच्या नेतृत्वाची जबाबदारी आता तीन पातळ्यांवर विभागण्यात आली आहे. अजित पवार यांच्या निधनानंतर पक्षाची सूत्रे स्वतःकडे घेतलेल्या सुनेत्रा पवार यांनी हा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. पक्ष अधिक प्रभावीपणे चालवण्यासाठी आणि भविष्यातील राजकीय आव्हानांना सामोरे जाण्यासाठी ही नवी रचना लागू करण्यात आली असल्याचे सांगितले जात आहे.

    Read more

    Sadavarte : अमित ठाकरेंना मारहाणीचा बॅच मिळालाय का?:वकील गुणरत्न सदावर्ते यांचा सवाल? ‘राज ठाकरेंची औलाद’ म्हणत साधला निशाणा

    : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे यांनी रिक्षा व टॅक्सी चालकांच्या संपात मराठी रिक्षा चालकांची अडवणूक करणाऱ्यांना मनसे स्टाईल धडा शिकवण्याचा इशारा दिला आहे. वकील गुणरत्न सदावर्ते यांनी या प्रकरणी त्यांच्यावर निशाणा साधला आहे. राज ठाकरेंची औलाद मारण्याची भाषा बोलते. अमित ठाकरे हवालदार झालेत? की आरटीओचे शिपाई? त्यांना कुणालाही मारहाण करण्याचा बॅच मिळालाय का? असे ते म्हणालेत.

    Read more

    Maharashtra Weather Alert : उष्णतेचा कडाका आणि वादळी पावसाचा इशारा; राज्यात ‘दुहेरी’ हवामानाचा ताण, पुढील 4 दिवस निर्णायक

    राज्यात सध्या हवामानाने दोन टोकांचे रूप धारण केले आहे. एका बाजूला प्रखर उष्णतेची लाट नागरिकांना हैराण करत आहे, तर दुसऱ्या बाजूला अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आल्याने अनिश्चिततेचे वातावरण निर्माण झाले आहे. विदर्भ आणि मराठवाड्यात तापमानाने धोकादायक पातळी गाठली असून अकोला आणि वाशिम जिल्ह्यांत पारा 42 अंश सेल्सिअसच्या पुढे गेला आहे.

    Read more

    महाराष्ट्राच्या पोलीस दलाची गुणवत्ता जागतिक पातळीवर नेण्याचा फडणवीस सरकारचा संकल्प; राज्य पोलीस क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन

    ३६ वी ‘महाराष्ट्र राज्य पोलीस क्रीडा स्पर्धा २०२६’ चा उद्घाटन सोहळा आज मुंबईतील कालिना येथील सशस्त्र पोलीस मुख्यालयात संपन्न झाला. याप्रसंगी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पोलीस दलाचे मनोधैर्य वाढण्यासाठी त्यांच्याशी संवाद साधून या स्पर्धेला शुभेच्छा दिल्या.

    Read more

    Manohar Bhonsle : बाळू मामाचा अवतार सांगणारा मनोहर भोसले पुन्हा गजाआड; कुर्डुवाडी पोलिसांकडून भोंदूगिरीप्रकरणी बेड्या

    स्वतःला बाळू मामाचा अवतार सांगणाऱ्या मनोहर मामा भोसलेला सोलापूर ग्रामीण पोलिसांनी पुन्हा एकदा बेड्या ठोकल्या आहेत. भोंदूगिरी आणि आर्थिक फसवणुकीच्या ताज्या प्रकरणात कुर्डुवाडी पोलिसांनी ही कारवाई केली आहे. मनोहर भोसलेवर याआधीच करमाळा आणि सोलापूर तालुका पोलिस ठाण्यात महिलांवर अत्याचार केल्याचे गंभीर गुन्हे दाखल आहेत. याशिवाय बारामती आणि दौंड पोलीस ठाण्यांमध्येही त्याच्यावर आर्थिक फसवणूक आणि भोंदूगिरीचे गुन्हे नोंदवण्यात आले असून, आजच्या कारवाईमुळे त्याच्यावरील गुन्ह्यांची मालिका अधिक गडद झाली आहे.

    Read more

    Sanjay Nirupam : केवळ ऑटो-टॅक्सीवाल्यांनाच मराठीची सक्ती का? कॉर्पोरेट-डिलिव्हरी बॉईजचे काय? लायसन्स रद्द करणे अन्याय- संजय निरुपम

    केवळ ऑटो-टॅक्सी वाल्यांना मराठी सक्तीचा निर्णय का? कॉर्पोरेट सेक्टरमध्ये काम करणारे मोठ्या कंपन्यामध्ये काम करणारे सर्व लोकं मराठीमध्ये बोलतात का? स्विगी, झोमॅटोचे डिलिव्हरी बॉय मराठी बोलतात का? सर्वांना मराठी शिकवण्याचा प्रयत्न सरकारतर्फे झाला पाहिजे, असे शिवसेना नेते संजय निरुपम यांनी म्हटेल आहे. हे काही आम्ही मतदान मिळावे म्हणून करत नाही, लोकांचा रोजगार जावू नये यासाठी आम्ही काम करत आहोत.

    Read more

    Sanjay Gaikwad : संजय गायकवाड यांची अखेर दिलगिरी; ‘शिवाजी कोण होता’ वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न

    सत्ताधारी शिवसेनेचे बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांनी अखेर ‘शिवाजी कोण होता’ पुस्तकाच्या वादात दिलगिरी व्यक्त करत त्यावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला आहे. प्रस्तुत प्रकरणात माझ्याकडून काही अयोग्य शब्द वापरले गेले. या प्रकरणी कुणाच्या भावना दुखावल्या गेल्या असतील, तर मी त्याबद्दल खेद व्यक्त करतो, असे ते म्हणालेत. छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख मी कदापि सहन करणार नाही, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.

    Read more

    उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेंनी दिलेला शब्द पूर्ण; ठाणे – भिवंडी – कल्याण विस्तारित मेट्रो ५ मार्गासाठी १८,१३० कोटींचा निधी मंजूर

    उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेला शब्द पूर्ण केला. मेट्रो – ५ ( ठाणे – भिवंडी – कल्याण ) प्रकल्पातील विस्तारित मार्गिकेसाठी १८ हजार १३० कोटींच्या निधीला मंजूरी मिळाली. खासदार श्रीकांत शिंदे यांनी ही माहिती दिली.

    Read more

    राष्ट्रवादी काँग्रेस आता जास्तच घराणेशाहीच्या कोंडीत; सुनेत्रा पवारांनी वाढ केली दोन्ही मुलांच्याच जबाबदारीत!!

    राष्ट्रवादी काँग्रेस आता जास्तच घराणेशाहीच्या कोंडीत; सुनेत्रा पवारांनी वाढ केली दोन्ही मुलांच्याच जबाबदारीत!!, ही राजकीय घडामोड घडल्याचे बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदान झाल्यानंतर समोर आली.

    Read more

    Sanjay Nirupam : रिक्षाचालकांना मराठी सक्तीवरून शिंदे गटातच ठिणगी; संजय निरुपम यांचे सरनाईकांना पत्र, फेरविचार करण्याची मागणी

    राज्यातील टॅक्सी, रिक्षा तसेच ओला आणि उबर चालकांनी प्रवाशांशी मराठीतच संवाद साधणे आता अनिवार्य करण्यात आले आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी या निर्णयाची १ मे म्हणजेच ‘महाराष्ट्र दिना’पासून काटेकोर अंमलबजावणी करण्याचे आदेश दिले आहेत. मात्र, या निर्णयामुळे शिवसेना (शिंदे गट) अंतर्गत मतभेद चव्हाट्यावर आले असून, माजी खासदार संजय निरुपम यांनी या सक्तीला विरोध दर्शवत फेरविचाराचे पत्र प्रताप सरनाईक यांना पाठवले आहे.

    Read more

    Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंनीच विधानपरिषदेची निवडणूक लढवावी, खासदार सुप्रिया सुळेंचे ट्विट; हर्षवर्धन सपकाळांनीही घेतली ‘मातोश्री’वर भेट

    राज्यातील विधानपरिषदेच्या 10 जागांसाठी निवडणुका जाहीर झाल्या असून शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांचा कार्यकाळ संपल्याने रिक्त झालेल्या जागेवर कोणाची वर्णी लागणार, याची मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे. या जागेसाठी महाविकास आघाडीतून काँग्रेसने आधीच अनुकूलता दर्शवली असताना, आता खासदार सुप्रिया सुळे यांनी ट्विट करत उद्धव ठाकरेंनीच पुन्हा निवडणूक लढवावी, अशी विनंती केल्याने शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसनेही त्यांच्याच नावाला पसंती दिल्याचे स्पष्ट झाले आहे.

    Read more

    Sharad Pawar : शरद पवार यांना रुग्णालयातून डिस्चार्ज; प्रकृती पूर्णपणे ठणठणीत, डॉक्टरांचा पूर्ण विश्रांती घेण्याचा सल्ला

    राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि ज्येष्ठ नेते शरद पवार यांची प्रकृती पूर्णपणे स्थिर असून, नियमित वैद्यकीय तपासणीनंतर ते आता आपल्या ‘सिल्व्हर ओक’ या निवासस्थानी विश्रांती घेत आहेत. सोमवारी त्यांना मुंबईतील ब्रीच कॅण्डी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्यावर उपचार झाल्यानंतर आज त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे.

    Read more

    Rohit Pawar : 2029 मध्ये पवार vs पवार होऊ शकते; सुनेत्रा काकींना आमचा भावनिक पाठिंबा, बारामती पोटनिवडणुकीवर रोहित पवारांचे वक्तव्य

    बारामती पोटनिवडणुकीसाठीचे मतदान आज पार पडत आहे. अजित पवारांच्या निधनानंतर बारामती विधानसभा मतदारसंघाची ही पोटनिवडणूक होत आहे आणि येथून सुनेत्रा पवार या उमेदवार आहेत. त्यामुळे या निवडणुकीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. तसेच सुनेत्रा पवार निवडून येणार असा विश्वास अनेकांकडून व्यक्त केला जात आहे. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवारांनी भाष्य केले आहे. भावनिक दृष्टिकोणातून आमचा सुनेत्रा काकींना या निवडणुकीसाठी पाठिंबा आहे. मात्र शेवटी त्या सत्तेत आहेत आणि महाराष्ट्राच्या हिताच्या विरोधात त्यांच्या पक्षातील लोकांकडून काही निर्णय घेण्यात आले तर आम्ही त्याचा विरोध करणार, असे पवारांनी स्पष्ट केले आहे. तसेच 2029 च्या निवडणुकीत पवार विरुद्ध पवार निवडणूक होणार का? यावर देखील त्यांनी स्पष्ट उत्तर दिले आहे.

    Read more

    बारामतीत विक्रमी मताधिक्क्याचा विषय राहिला बाजूला; मतदानाच्या दिवशीच रोहित विरुद्ध इतर पवारांचा रंगला कलगीतुरा!!

    बारामतीत विक्रमी मताधिक्याचा विषय राहिला बाजूला; मतदानाच्या दिवशीच रोहित विरुद्ध इतर पवारांचा रंगला सामना!!, हेच राजकीय वास्तव 23 एप्रिल 2026 रोजी समोर आले.

    Read more

    राहुल गांधींचा ममता बॅनर्जींना टोला, पण सुप्रिया सुळेंचा ममतांना पाठिंबा!!

    राहुल गांधींचा ममता बॅनर्जींना टोला, पण सुप्रिया सुळेंचा पाठिंबा!!, ही राजकीय विसंगती आज समोर आली. राहुल गांधींनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या कारभाराला ठोकून काढले, तर सुप्रिया सुळे यांनी ममता बॅनर्जी यांना पाठिंबा दिला.

    Read more

    बारामतीच्या पोटनिवडणुकीत मतदानाच्या दिवशीच तीन पवारांच्या तोंडी तीन वेगवेगळ्या भाषा; राजकीय मतभेदांना फुटल्या वाटा!!

    बारामतीच्या पोटनिवडणुकीत मतदानाच्या दिवशीच तीन पवारांच्या तोंडी तीन वेगवेगळ्या भाषा; राजकीय मतभेदांना फुटल्या वाटा!!, असेच राजकीय चित्र आज समोर आले.

    Read more

    अजित पवारांचा घातपात ते बारामतीत पवार विरुद्ध पवार; रोहित पवारांचा एक राजकीय प्रवास!!

    अजित पवारांचा घातपात ते बारामती पवार विरुद्ध पवार; रोहित पवारांचा एक राजकीय प्रवास!!, असेच वर्णन करणारी राजकीय घडामोड आज बारामतीतून समोर आली.

    Read more

    2006 Malegaon Blast : मालेगाव स्फोट प्रकरणात मोठा ट्विस्ट; चार आरोपींना दिलासा, उच्च न्यायालयाचा निर्णय; तपास आणि पुराव्यांवर पुन्हा प्रश्नचिन्ह

    मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात मोठा घडामोडींचा टप्पा गाठत मुंबई उच्च न्यायालयाने महत्त्वाचा निर्णय दिला आहे. 2006 साली झालेल्या स्फोट प्रकरणातील चार आरोपींना न्यायालयाने मोठा दिलासा दिला असून, सत्र न्यायालयाने यांच्याविरोधात निश्चित केलेले आरोप रद्द केले आहेत. या निर्णयामुळे अनेक वर्षांपासून सुरू असलेला खटला आता संपुष्टात येण्याच्या मार्गावर आहे. न्यायालयाच्या या आदेशानंतर आरोपींना दिलासा मिळाला असून, प्रकरणातील तपास आणि पुराव्यांवर पुन्हा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

    Read more

    Maharashtra : गडचिरोलीपासून कोकणापर्यंत उद्योगांचे जाळे; विशाल, अतिविशाल प्रकल्पांना विशेष प्रोत्साहन; 18 प्रस्तावांना CM फडणवीसांची मंजुरी

    राज्यात मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक आकर्षित करून रोजगारनिर्मितीला चालना देण्यासाठी तब्बल ₹2,56,137.01 कोटींच्या 18 विशाल व अतिविशाल प्रकल्पांना विशेष प्रोत्साहन देण्यास मान्यता देण्यात आली. यामुळे सुमारे 1 लाखांहून अधिक प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष रोजगारनिर्मिती होणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

    Read more

    Rohit Pawar : कोर्टाचा दिलासा मिळाल्यावर रोहित पवारांची पोस्ट; म्हटले- आरोपांतून वगळत ED कारवाईतून सुटका

    महाराष्ट्र राज्य सहकारी बँक घोटाळा प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांच्याविरोधात अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) दाखल केलेल्या पूरक आरोपपत्रानंतर आता या प्रकरणाला नवा कलाटणी मिळाली आहे. न्यायालयाने या प्रकरणात रोहित पवार यांना मोठा दिलासा दिल्याची माहिती समोर आली असून, त्यांनी स्वतः समाजमाध्यमांवर पोस्ट करत न्यायालयावर पूर्ण विश्वास असल्याचे पुन्हा एकदा अधोरेखित केले आहे.

    Read more

    Girish Mahajan : गिरीश महाजनांची व्हायरल व्हिडिओवर प्रतिक्रिया; म्हणाले – सदर महिला नको त्या भाषेत बोलत होती, तिने पोलिसांशीही अरेरावी केली

    मुंबईच्या वरळी येथे महायुतीच्या आक्रोश मोर्चामुळे निर्माण झालेल्या वाहतूक कोंडीत एका सामान्य महिलेने भाजपचे नेते आणि राज्याचे मंत्री गिरीश महाजन यांना चांगलेच सुनावल्याचे पाहायला मिळाले. यावरून विरोधकांनी सरकारवर विशेषतः भाजपवर जोरदार हल्लाबोल केला आहे. आता काल घडलेल्या प्रकरणावर मंत्री गिरीश महाजन यांनी माध्यमांसमोर येऊन प्रतिक्रिया दिली आहे. तसेच त्या महिलेची भाषा योग्य नव्हती, त्या वाट्टेल ते बोलत असल्याचे महाजन यांनी म्हटले आहे.

    Read more

    Manoj Jarange Patil : ‘मराठा-कुणबी’ स्वतंत्र मंत्रालय स्थापन करा; मराठा आरक्षण उपसमिती बरखास्त करा, मनोज जरांगे पाटलांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

    मराठा समाजाच्या प्रश्नांवर ठोस तोडगा काढण्यासाठी आणि समाजाच्या सुख-दुःखाकडे पूर्णवेळ लक्ष देण्यासाठी राज्यात स्वतंत्र ‘मराठा आणि कुणबी’ मंत्रालय स्थापन करावे, अशी आग्रही मागणी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. धाराशिव येथे भीम जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना त्यांनी ही मागणी केली. यावेळी त्यांनी मराठा आरक्षण उपसमितीच्या कामकाजावर तीव्र नाराजी व्यक्त करत मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला.

    Read more