• Download App
    Chhatrapati Sambhajinagar छत्रपती संभाजीनगरात FDA चा दणका; तब्बल 2.93 कोटींचे संशयित खाद्यतेल जप्त; 2 कंपन्यांचे परवाने निलंबित

    Chhatrapati Sambhajinagar : छत्रपती संभाजीनगरात FDA चा दणका; तब्बल 2.93 कोटींचे संशयित खाद्यतेल जप्त; 2 कंपन्यांचे परवाने निलंबित

    Chhatrapati Sambhajinagar

    विशेष प्रतिनिधी

    छत्रपती संभाजीनगर : Chhatrapati Sambhajinagar  ‘सेफ फूड-सेफ महाराष्ट्र’ मोहिमेअंतर्गत अन्न व औषध प्रशासनाने (FDA) छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात मोठी धडक कारवाई केली आहे. अत्यंत अस्वच्छ वातावरणात खाद्यतेलाचे रिपॅकिंग करणाऱ्या दोन मोठ्या कंपन्यांचे परवाने निलंबित करण्यात आले आहेत. तसेच, या ठिकाणाहून तब्बल २ कोटी ९३ लाख रुपयांचा संशयित निकृष्ट तेलाचा साठा जप्त करण्यात आला असून यामुळे खळबळ उडाली आहे.Chhatrapati Sambhajinagar

    नेमकी कारवाई कुठे झाली?

    मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे एफडीएच्या (FDA) पथकाने जिल्ह्यातील दोन मोठ्या ऑइल रिपॅकिंग युनिट्सवर अचानक धाड टाकली. यामध्ये पैठण तालुक्यातील ‘बागारिया ॲग्रो प्रॉडक्ट्स’ आणि शहरातील ‘बागारिया व्हेजिटेबल प्रॉडक्ट्स प्रायव्हेट लिमिटेड’ या दोन कंपन्यांचा समावेश आहे.Chhatrapati Sambhajinagar



    तपासणीत उघड झाला धक्कादायक प्रकार

    या कारखान्यांची पाहणी केली असता, अधिकाऱ्यांना तिथे अत्यंत धक्कादायक परिस्थिती आढळून आली.

    जुन्या आणि वापरलेल्या टिनच्या डब्यांमध्ये पुन्हा तेलाचे रिपॅकिंग केले जात होते.
    उत्पादन अतिशय अस्वच्छ वातावरणात सुरू होते. यंत्रसामग्रीवर धूळ, गंज, कोळीष्टके आणि घाणीचे साम्राज्य होते.
    दुर्गंधीयुक्त तेलाचे टब उघड्यावर ठेवलेले आढळले.
    विशेष म्हणजे, बंद पडलेला रिफायनरी विभाग आणि सध्या सुरू असलेला रिपॅकिंग विभाग एकाच ठिकाणी असल्याने ‘क्रॉस-कंटॅमिनेशन’चा (संसर्गाचा) मोठा धोका निर्माण झाला होता.

    नियमांची सर्रास पायमल्ली

    स्वच्छतेचा अभाव तर होताच, पण प्रशासकीय आणि तांत्रिक नियमांचेही येथे उल्लंघन होत असल्याचे उघडकीस आले. कारखान्यात स्वतःची प्रयोगशाळा नव्हती. तेलाचे विश्लेषण अहवाल, तांत्रिक अधिकाऱ्याची नियुक्ती यापैकी काहीही नव्हते. साठवणुकीच्या टाक्या आणि पाइपलाइनवर कोणतीही ओळख चिन्हे किंवा लेबल्स नव्हती, उलट त्यावर घाणीचा जाड थर साचला होता. तसेच, पॅकेजिंगसाठी ‘फूड ग्रेड’ प्रमाणपत्राचाही अभाव होता.

    पावणेतीन कोटींचा साठा जप्त

    नागरिकांच्या आरोग्याशी होणारा हा गंभीर खेळ उघडकीस आल्यानंतर, प्रशासनाने तातडीने कठोर पावले उचलली. या कारवाईत पाम, सोयाबीन, कपाशी आणि काही अज्ञात वनस्पती तेलाचा तब्बल २ कोटी ९३ लाख रुपयांचा साठा जप्त करण्यात आला आहे. लोकांच्या सुरक्षेला प्राधान्य देत या दोन्ही कंपन्यांचे परवाने तत्काळ प्रभावाने निलंबित करण्यात आले आहेत. जप्त केलेल्या तेलाचे नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात आले असून, या कारवाईमुळे भेसळखोरांचे धाबे दणाणले आहेत.

    FDA cracks down in Chhatrapati Sambhajinagar; suspected edible oil worth ₹2.93 crore seized; licenses of two companies suspended.

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Vinayak Raut : विनायक राऊतांवर सूनेचे जादूटोण्याचे गंभीर आरोप; राऊतांचा पलटवार; माझ्या बदनामीचे षडयंत्र, 12.50 कोटींची मागणी!

    Uddhav Thackeray : ‘कॉकरोच’च्या आंदोलनाला उद्धव ठाकरेंचा जाहीर पाठिंबा; सर्व पक्षांना समर्थनाचे आवाहन

    Suneetra Pawar : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अंतर्गत स्फोट? उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाला पक्षातूनच आव्हान; ज्येष्ठ नेत्याची कायदेशीर नोटीस