‘Gulabrao Patil : ऑपरेशन टायगर 3.0’ सुरू झाल्याचा गुलाबराव पाटलांचा दावा, 14 हून अधिक आमदार संपर्कात असल्याचे वक्तव्य
शिवसेना ठाकरे गटातील सहा खासदारांनी शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठ्या राजकीय घडामोडींची चर्चा सुरू झाली आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी “ऑपरेशन टायगर 3.0” सुरू झाल्याचा दावा करत आणखी 14 हून अधिक आमदार शिंदे गटाच्या संपर्कात असल्याचे वक्तव्य केले आहे. त्यांच्या या दाव्यामुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात नव्या चर्चांना उधाण आले आहे.