• Download App
    MSRTC वाढत्या डिझेल दरांचा परिणाम; साध्या बसेसवरील 10 टक्के तिकीटवाढ 31 जुलैपर्यंत कायम; प्रवाशांना सहकार्याचे आवाहन

    MSRTC : वाढत्या डिझेल दरांचा परिणाम; साध्या बसेसवरील 10 टक्के तिकीटवाढ 31 जुलैपर्यंत कायम; प्रवाशांना सहकार्याचे आवाहन

    MSRTC

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : MSRTC  वाढत्या डिझेल दरांमुळे एसटी महामंडळाच्या आर्थिक स्थितीवर मोठा ताण पडत असल्याने, प्रशासनाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. साध्या बसगाड्यांसाठी लागू करण्यात आलेली १० टक्के तात्पुरती भाडेवाढ आता ३१ जुलै २०२६ पर्यंत कायम राहणार आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (एसटी) १५ जुलै २०२६ रोजी प्रसिद्ध केलेल्या एका परिपत्रकाद्वारे ही अधिकृत माहिती दिली असून, प्रवाशांनी या निर्णयास सहकार्य करावे असे आवाहनही प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.MSRTC

    डिझेल दरवाढीचा एसटीला फटका

    ग्रामीण महाराष्ट्राची जीवनवाहिनी असलेल्या एसटी महामंडळाकडून दररोज लाखो प्रवाशांना परवडणारी आणि विश्वासार्ह सेवा उपलब्ध करून दिली जाते. मात्र, गेल्या काही कालावधीत डिझेलच्या दरात मोठी वाढ झाल्यामुळे महामंडळाच्या दैनंदिन इंधन खर्चात प्रचंड वाढ झाली आहे. याचा थेट परिणाम महामंडळाच्या आर्थिक स्थितीवर होत आहे. अशा कठीण परिस्थितीतही प्रवाशांना अखंडित आणि दर्जेदार सेवा देता यावी, यासाठी प्रशासनाने साध्या बसगाड्यांवरील ही परिवर्तनशील (हंगामी) भाडेवाढ कायम ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.MSRTC



     

    उन्हाळी हंगामातील भाडेवाढीला मुदतवाढ

    एसटी महामंडळाने यापूर्वी उन्हाळी गर्दीचा हंगाम लक्षात घेऊन, साध्या बसगाड्यांच्या भाड्यात तात्पुरती १० टक्के वाढ लागू केली होती. या भाडेवाढीची मुदत १५ जुलै २०२६ रोजी रात्री २४.०० वाजेपर्यंत (१२ वाजेपर्यंत) होती. तथापि, सध्याची वाढती प्रवासी संख्या, वाहतुकीची मोठी गरज आणि वाढलेला इंधन खर्च या सर्व बाबींचा गांभीर्याने विचार करून या भाडेवाढीस आता मुदतवाढ देण्यात आली आहे.

    ३१ जुलैपर्यंत १० टक्के जास्तीचे भाडे

    महामंडळाच्या नव्या निर्णयानुसार, आता ३१ जुलै २०२६ रोजी रात्री २४.०० वाजेपर्यंत साध्या बससेवा प्रकारासाठी ही १० टक्के जास्तीची परिवर्तनशील भाडेवाढ लागू राहणार आहे. प्रवाशांना सुरक्षित, नियमित आणि दर्जेदार सेवा उपलब्ध करून देणे हे महामंडळाचे मुख्य उद्दिष्ट असून, वाढत्या इंधन खर्चाचा ताण काही प्रमाणावर कमी करण्यासाठीच हा निर्णय घेण्यात आल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

    MSRTC Extends 10% Ticket Fare Hike on Ordinary Buses Until July 31

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    दोन्ही राष्ट्रवादींचा “एक्सप्लेनेशन मोड” संपेना; करावा लागलाय वारंवार खुलासा!!

    Aamir Khan : आमिर खानचे तिसरे लग्न अवैध – यूपीच्या मुफ्तीचा फतवा; म्हटले- गैर-मुस्लिम महिलेसोबत नाते गुन्हा, करणी सेना म्हणाली- अभिनेता लव्ह जिहादी

    Ramesh Mhatre : डॉक्टरांना मारहाण प्रकरण; नगरसेवक रमेश म्हात्रेंना दिलासा; 50 हजारांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर