विशेष प्रतिनिधी
मुंबई : Ramesh Mhatre डोंबिवलीतील शासकीय रुग्णालयात डॉक्टरांना मारहाण केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या शिवसेना नगरसेवक रमेश म्हात्रे यांना कल्याण न्यायालयाने 50 हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला आहे. मात्र, या प्रकरणातील इतर आरोपी अद्याप न्यायालयीन कोठडीत आहेत.Ramesh Mhatre
नेमका युक्तिवाद काय झाला?
कल्याण न्यायालयात जामीन अर्जावर सुनावणी सुरू असताना सरकारी वकील आणि आरोपींचे वकील यांच्यात युक्तिवाद झाला. म्हात्रे यांना जामीन दिल्यास ते बाहेर येऊन फिर्यादीवर दबाव टाकू शकतात आणि अडचणी निर्माण करू शकतात, अशी भीती सरकारी वकिलांनी व्यक्त केली होती. मात्र, म्हात्रे यांच्या वकिलांनी त्यांच्या प्रकृतीचा आणि मेडिकलचा मोठा आधार घेतला. म्हात्रे यांच्यावर यापूर्वी झालेल्या एका गोळीबारात त्यांची एक किडनी निकामी झाली आहे, हा मुद्दा वकिलांनी कोर्टाच्या निदर्शनास आणून दिला. या सर्व बाबींचा विचार करत न्यायालयाने म्हात्रे यांना ५० हजारांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला.Ramesh Mhatre
आधी कोठडी, मग जामीन
याआधी रमेश म्हात्रे यांची प्रकृती ठीक नसल्याचे कारण देत पोलिसांनी त्यांना व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे हजर करण्याची विनंती न्यायालयाला केली होती. मात्र, न्यायाधीश के. एस. कातकडे यांनी हा अर्ज फेटाळून लावत आरोपीला प्रत्यक्ष कोर्टात हजर करण्याचे कडक आदेश दिले होते. त्यानंतर म्हात्रे आणि इतर आरोपींना प्रत्यक्ष हजर केले असता, कोर्टाने त्यांना २४ जुलैपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली होती. याच दरम्यान म्हात्रे यांच्या वकिलांनी जामिनासाठी अर्ज केला होता, ज्यावर त्यांना आता दिलासा मिळाला आहे. उर्वरित आरोपींच्या जामिनावर न्यायालय नंतर निर्णय घेणार आहे.
व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर झाली होती अटक
डोंबिवलीच्या शास्त्रीनगर रुग्णालयात एका महिला डॉक्टरसह नर्स आणि इतर कर्मचाऱ्यांना रमेश म्हात्रे आणि त्यांच्या साथीदारांनी बेदम मारहाण केली होती. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाल्यानंतर संतापाची लाट उसळली. पोलिसांनी सुरुवातीला म्हात्रेंच्या तीन साथीदारांना अटक केली होती. मात्र, विरोधकांनी आक्रमक पवित्रा घेतल्यानंतर मुख्य आरोपी असलेल्या रमेश म्हात्रे यांनाही विष्णुनगर पोलिसांनी बेड्या ठोकल्या होत्या.
ज्यांनी जीवदान दिले, त्यांच्यावरच उगारला हात
रमेश म्हात्रे यांच्यावर यापूर्वी अपहरण आणि हत्येच्या प्रयत्नासारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत. २००८ मध्ये म्हात्रे यांच्यावर एक जीवघेणा हल्ला झाला होता, ज्यात त्यांना गोळी लागली होती. त्यावेळी मृत्यूशी झुंज देणाऱ्या म्हात्रेंवर डोंबिवलीतील डॉ. मिलिंद शिरोडकर यांनी तातडीने शस्त्रक्रिया करून त्यांचे प्राण वाचवले होते. एका जुन्या हल्ल्यात म्हात्रे यांची किडनी निकामी झाली असतानाही याच डॉक्टरांनी त्यांना मृत्यूच्या दाढेतून बाहेर काढले होते. म्हात्रे डॉ. शिरोडकरांच्या पाया पडायचे. मात्र, ज्या वैद्यकीय क्षेत्राने त्यांना दोनदा जीवदान दिले, त्याच क्षेत्रातील कर्मचाऱ्यांवर हात उचलल्याने त्यांच्यावर मोठी टीका होत आहे.
Doctor Assault Case: Shiv Sena Corporator Ramesh Mhatre Gets Bail
महत्वाच्या बातम्या
- अमरनाथ यात्रेकरूंनी तोडले रेकॉर्ड; १२ दिवसांमध्ये किती लोकांनी केली यात्रा??; वाचा सविस्तर!!
- शेतकरी कर्जमाफीसाठी मोठा दिलासा; २३ लाख शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर लाभ!!
- आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर पंढरपुरात मटण – मांस विक्रीवर बंदी; पण खवचट मराठी माध्यमांना “खटकली’ खवय्यांची “कोंडी”!!
- सुनेत्रा पवारांच्या नेतृत्वाला आव्हान मिळताच राष्ट्रवादी झटकन explanation mode मध्ये!!; सच्चिदानंद सिंह यांच्या मागे कुणाची चालली बुद्धी??