Ramesh Mhatre : डॉक्टरांना मारहाण प्रकरण; नगरसेवक रमेश म्हात्रेंना दिलासा; 50 हजारांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर
डोंबिवलीतील शासकीय रुग्णालयात डॉक्टरांना मारहाण केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या शिवसेना नगरसेवक रमेश म्हात्रे यांना कल्याण न्यायालयाने 50 हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला आहे. मात्र, या प्रकरणातील इतर आरोपी अद्याप न्यायालयीन कोठडीत आहेत.