• Download App
    Maharashtra Finance महाराष्ट्राचे अर्थ मंत्रालय राष्ट्रवादीचा हक्क की आणखी काही??

    महाराष्ट्राचे अर्थ मंत्रालय राष्ट्रवादीचा हक्क की आणखी काही??

    Maharashtra Finance

    नाशिक : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे आणि जयंत पाटील यांनी म्हणे एकत्र जाऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वर्षावर भेट घेतली. त्यामुळे महाराष्ट्रातल्या राजकारणात मोठा ट्विस्ट आला. त्यात मोठा भूकंप होणार, अशा बातम्यांचे पेव फुटले. त्यामध्येच अमोल मिटकरी या विधान परिषदेतून निवृत्त झालेल्या आमदाराने आपल्या ट्विट मधून भर टाकली. त्यात राष्ट्रवादीच्या तथाकथित हक्काच्या अर्थ मंत्रालयाच्या बातमीची शेपूट जोडली.Maharashtra Finance Ministry the NCP’s prerogative, or something else?

    प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे हे आमच्या पक्षाचे नेते मुख्यमंत्र्यांना भेटले म्हणजे ते अर्थ खात्यासाठी भेटले असतील, असे सुरुवातीला वाटले, पण त्यांच्याबरोबर जयंत पाटील सुद्धा मुख्यमंत्र्यांच्या भेटीला पोहोचल्याने राजकारणात मोठ्या ट्विस्ट येईल, असा दावा अमोल मिटकरी यांनी केला.



    – अर्थ खात्यासाठी राष्ट्रवादीची धडपड

    अजित पवारांच्या अकाली एक्झिट नंतर झालेल्या मोठ्या राजकीय मंथनात सुनेत्रा पवारांना उपमुख्यमंत्री पदाची आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदाची जबाबदारी स्वीकारावी लागली, पण त्याचवेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपच्या केंद्रीय नेत्यांच्या सल्ल्यानुसार महाराष्ट्राचे अर्थ खाते स्वतःकडे ठेवले. तेव्हापासून राष्ट्रवादीतले नेते महाराष्ट्रातले अर्थ खाते परत राष्ट्रवादीच्या नेत्यांना मिळावे किंबहुना सुनेत्रा पवारांना मिळावे, यासाठी धाय मोकलतायेत. त्यांची त्या अर्थ खात्यावाचून घुसमट होते आहे. कसेही करून आणि कुणीही करून राष्ट्रवादीच्या हक्काचे अर्थ खाते राष्ट्रवादीला द्यावे, यासाठी वेगवेगळे “डाव” टाकले जात आहेत. पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे केंद्रीय नेते बघायला तयार नाहीत.

    – अर्थ खाते राष्ट्रवादीचा नैसर्गिक अधिकार नव्हे

    मूळात महाराष्ट्राचे अर्थ खाते हा काही राष्ट्रवादीचा नैसर्गिक अधिकार नाही. तो खरं म्हणजे अजित पवारांचा सुद्धा नैसर्गिक अधिकार नव्हता कारण मुख्यमंत्री ठरवतील त्यानुसारच खाते वाटप होते हा राज्यघटनात्मक सर्वसामान्य नियम आहे. त्यापलीकडे अन्य कुठल्या खात्यांना फारसा अधिकार आणि अर्थ नाही, पण महाराष्ट्रातल्या राजकीय युती आणि आघाड्या यांच्या राजकीय अपरिहार्यतेमुळे अजित पवारांनी अर्थ खात्यावर कायमचा अधिकार सांगितला आणि तो राजकीय अपरिहार्यतेपोटी सुरुवातीला काँग्रेसला मान्य करावा लागला. त्यामुळे अजित पवार अर्थ खात्यामध्ये खुंटा ठोकून बसले होते.

    – फडणवीसांकडून बोळवण

    वास्तविक अजित पवार हे औपचारिकपणे फार शिकलेले नेते होते असे नव्हे, पण त्यांनी त्यांच्या शिस्तबद्ध वर्तणुकीतून अर्थ खात्यावर आपली पकड निर्माण केली होती, पण म्हणून तो त्यांचा नैसर्गिक अधिकार होता असे मानणे घटनाबाह्य वर्तन आहे. ते मुख्यमंत्र्यांच्या अधिकाराला छेद देणारे वर्तन आहे, हे सुद्धा राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या कधी लक्षात आले नाही, पण देवेंद्र फडणवीस आणि भाजपच्या केंद्रीय नेत्यांनी राजकीय कृतीतून ते त्यांच्या लक्षात आणून दिले. देवेंद्र फडणवीस यांना आतापर्यंत पत्रकारांनी राष्ट्रवादीचा हवाला देऊन अर्थाचा विषय अनेकदा प्रश्न विचारले, पण योग्य वेळ घेताच योग्य निर्णय घेऊ, असे सांगून देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकारांची बोळवण केली. पण प्रत्यक्षात ती राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची बोळवण होती. देवेंद्र फडणवीस यांनी सूचक पद्धतीने महाराष्ट्राचे अर्थ खाते हा राष्ट्रवादीचा नैसर्गिक अधिकार नाही हे सांगून पाहिले, पण राष्ट्रवादीचे नेते ऐकायलाच तयार नसतील आणि ते वेगवेगळ्या मार्गांनी अर्थ खात्यासाठी काड्या घालणार असतील, तर देवेंद्र फडणवीसंना वेगळ्या मार्गाने पण ठामपणे तसे त्यांना सांगावे लागेल. हेच प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे आणि जयंत पाटील यांच्या भेटीनंतर राजकीय वास्तव समोर आलेय.

    Maharashtra Finance Ministry the NCP’s prerogative, or something else?

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Bawankule : ‘राहुल गांधींना चुकीचे ब्रीफिंग मिळते’; चंद्रशेखर बावनकुळे यांचा पलटवार, दुबार पेरणीसाठी मोठ्या मदतीची घोषणाही केली

    Mumbai FDA : मुंबईतील 3 नामांकित हॉटेल्सवर FDA चा छापा; स्वच्छता, अन्नसुरक्षा आणि परवाना नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी कारवाई

    Pandharpur : पंढरपुरात 15 दिवस मटण-मांस विक्रीवर कडक बंदी; आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाचा मोठा निर्णय