MSRTC : वाढत्या डिझेल दरांचा परिणाम; साध्या बसेसवरील 10 टक्के तिकीटवाढ 31 जुलैपर्यंत कायम; प्रवाशांना सहकार्याचे आवाहन
वाढत्या डिझेल दरांमुळे एसटी महामंडळाच्या आर्थिक स्थितीवर मोठा ताण पडत असल्याने, प्रशासनाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. साध्या बसगाड्यांसाठी लागू करण्यात आलेली १० टक्के तात्पुरती भाडेवाढ आता ३१ जुलै २०२६ पर्यंत कायम राहणार आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (एसटी) १५ जुलै २०२६ रोजी प्रसिद्ध केलेल्या एका परिपत्रकाद्वारे ही अधिकृत माहिती दिली असून, प्रवाशांनी या निर्णयास सहकार्य करावे असे आवाहनही प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.