Sharad pawar : 2019 मध्ये ज्या वेगाने पवारांनी महाविकास आघाडीची खिचडी “शिजवली”, तीच 2024 मध्ये त्यांना निभेना!!

Sharad pawar

नाशिक : 2019 मध्ये ज्या वेगाने शरद पवारांनी महाविकास आघाडीची खिचडी “शिजवली”, तीच 2024 मध्ये त्यांना निभेनाशी झाली आहे, असे महाविकास आघाडीतल्या वेगवेगळ्या घटक पक्षांच्या राजकीय हालचाली आणि भूमिकांवरून समोर आले आहे. Sharad pawar not able to keep the MVA flok together

2019 मध्ये विधानसभा निवडणुकीचे निकाल लागले, त्यामध्ये भाजपला 100 पेक्षा जास्त जागा मिळाल्या होत्या, तरी त्या पक्षाचे शिवसेनेचे अवलंबित्व वाढले होते. शिवसेनेला 56 जागा मिळाल्या होत्या. तिथेच पवारांनी महाविकास आघाडीची संभाव्यता “हेरली” होती. किंबहुना उद्धव ठाकरेंची त्यांचे “आतून” आधीपासूनच संधान होते. हे आता उघडपणे बोलले जाऊ लागले आहे, पण भाजपचे शिवसेनेचे अवलंबित्व वाढले ही वस्तुस्थिती पवारांच्या लक्षात आल्याबरोबर त्यांनी त्यावेळी वेगाने हालचाली केल्या. अशक्यप्राय वाटणारी काँग्रेस आणि शिवसेना यांची एकत्रित मोट बांधून महाविकास आघाडी तयार केली. उद्धव ठाकरे यांनाच मुख्यमंत्री केले, शिवसेनेला सत्तेतला सर्वाधिक वाटा दिला तरच ही आघाडी टिकेल याची खूणगाठ तेव्हा पवारांनी बांधली आणि ती काँग्रेस हायकमांडच्या देखील गळी उतरवली होती. पवारांनी त्यावेळी बिनतोड राजकीय कौशल्य दाखविले होते, त्या कौशल्यात त्यावेळी भाजपचे “चाणक्य” खूपच तोकडे पडले होते. Sharad pawar

पण पवारांनी 2019 मध्ये ज्या वेगाने हालचाली करून महाविकास आघाडीची मोट बांधली, ती मात्र 2024 मध्ये त्यांना निभेनाशी झाली आहे. पवारांच्या “चाणक्यगिरी”चे आणि “डाव” टाकण्याचे कितीही गुणगान मराठी माध्यमांनी चालविले असले, तरी प्रत्यक्षात पवार सध्या महाविकास आघाडीची मोट टिकवून ठेवण्यात कमी पडत आहेत, ही वस्तुस्थितीच समोर दिसते आहे आणि याची कारणे 2024 मधल्या वेगळ्या राजकीय परिस्थितीत आहेत.

Wheat MSP : गव्हाचा MSP 150 रुपयांनी वाढला, 6 रब्बी पिकांच्या आधारभूत किमतीत वाढ, केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय

2019 मध्ये काँग्रेस तिसऱ्या क्रमांकाचा पक्ष होता. त्यामुळे शिवसेना आणि पवार काँग्रेसवर वरचष्मा राखू शकले होते. पवार म्हणतील त्यापुढे मान तुकविण्या खेरीज त्यावेळी काँग्रेसला पर्याय नव्हता. अन्यथा सत्तेसाठी पवारांनी त्यावेळी 44 आमदारांची काँग्रेस देखील उभी फोडली असती याची जाणीव काँग्रेस हायकमांडला झाली होती म्हणूनच काँग्रेस हायकमांडने त्यावेळी शिवसेनेबरोबर “सत्ता सोबत” करायला करायची तयारी दाखविली होती.

पण 2024 च्या लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर परिस्थिती पूर्ण बदलली आहे. किंबहुना ती पवारांच्या “हाताबाहेर” गेली आहे. 2019 मध्ये काँग्रेस नेते “हाताळणे” पवारांना सोपे होते, पण ती परिस्थिती 2024 मध्ये नाही. काँग्रेस नेत्यांना “हाताळणे” पवारांसाठी आता इतके सोपे उरलेले नाही. त्याचबरोबर ज्या उद्धव ठाकरेंची मुख्यमंत्री पदाची महत्त्वाकांक्षा पवारांनी 2019 मध्ये फुलवून ठेवली, ती देखील 2024 मध्ये “मॅनेज” करताना पवारांची दमछाक होते आहे.

2019 मध्ये पवार दुसऱ्या क्रमांकाच्या पक्षाचे नेते होते. आता ते तिसऱ्या क्रमांकाच्या पक्षाचे नेते झालेत आणि काँग्रेस सारखा मातब्बर राष्ट्रीय पक्ष महाविकास आघाडीत “बॉस” बनलाय. उद्धव ठाकरे आणि काँग्रेस हायकमांड यांच्यात पवारांना वगळून संवादाचा “स्वतंत्र पूल” तयार झालाय. त्यामुळे महाविकास आघाडीची मोट जशीच्या तशी बांधायला पवारांना अवघड जात आहे.

– काँग्रेस हायकमांडच “बॉस”

महाविकास आघाडीत 100 – 80 – 80 असा फॉर्म्युला तयार झाल्याच्या बातम्या माध्यमांनी चालविल्या आहेत. याचा अर्थ उरलेल्या 28 जागांवर वाद आहे आणि तो वाद काँग्रेस हायकमांड + पवार आणि उद्धव ठाकरे अशा सर्वोच्च पातळीवरून सोडविण्याची तयारी सुरू आहे. 2024 मध्ये काँग्रेसचा वरचष्मा तयार झाल्याच्या पार्श्वभूमीवर हा 28 जागांचा वाद पवारांसाठी “गले की हड्डी” बनला आहे. मुख्यमंत्री पदाचा वाद तर निवडणुकीनंतर सोडवायचा आहे, पण काँग्रेस हायकमांड बरोबरच्या “निगोसिएशन्स” मध्ये पवार कायमच पराभूत झाल्याचा इतिहास आहे.

Sharad pawar not able to keep the MVA flok together

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात